Lokmat Agro >शेतशिवार > Ranbhajya : बाजारात आलेल्या 'या' आरोग्यवर्धक रानभाज्यांवर यंदा नक्की मारा ताव

Ranbhajya : बाजारात आलेल्या 'या' आरोग्यवर्धक रानभाज्यांवर यंदा नक्की मारा ताव

Ranbhajya : Be sure to try these healthy wild vegetables that have hit the market this year | Ranbhajya : बाजारात आलेल्या 'या' आरोग्यवर्धक रानभाज्यांवर यंदा नक्की मारा ताव

Ranbhajya : बाजारात आलेल्या 'या' आरोग्यवर्धक रानभाज्यांवर यंदा नक्की मारा ताव

Ranbhajya या पावसाळ्यात रानभाज्यांचे बाजारात लवकर आगमन झाले आहे. रानभाज्या बाजारपेठांमध्ये दाखल झाल्या असून, नागरिकांमध्ये त्यांना मोठी मागणी आहे.

Ranbhajya या पावसाळ्यात रानभाज्यांचे बाजारात लवकर आगमन झाले आहे. रानभाज्या बाजारपेठांमध्ये दाखल झाल्या असून, नागरिकांमध्ये त्यांना मोठी मागणी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

या पावसाळ्यात रानभाज्यांचेबाजारात लवकर आगमन झाले आहे. रानभाज्याबाजारपेठांमध्ये दाखल झाल्या असून, नागरिकांमध्ये त्यांना मोठी मागणी आहे.

दरवर्षी जुलैच्या अखेरपासून या भाज्यांची आवक बाजारात सुरु होत असते. पुढे सप्टेंबरपर्यंत या रानभाज्यांना मोठी मागणी असते.

बाजारपेठांमध्ये चिघळ, घोळ, कडवंची, शेवग्याची पाने, आंबडी, राजगिरा, अळू, पाथरी, केना, हदगा, गुळवेळ, सराटा, पिंपळ, भुईआवळा, कपाळफोडी इत्यादी रानभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत.

या भाज्या नैसर्गिकरीत्या उगवतात, त्यावर रसायने किंवा औषधांची फवारणी होत नाही. त्यामुळे या भाज्यांचे औषधी आणि पौष्टिक मूल्य अधिक आहे.

रानभाज्यांच्या लवकर आगमनाने शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होत असून, या भाज्यांचे जतन, प्रसारण आणि आहारातील समावेश वाढवण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन संबंधित संस्थांकडून करण्यात येत आहे.

रानभाज्यांचे फायदे
◼️ खोकला, सर्दी, ताप, पोटदुखी, दमा, संधिवात, मधुमेह आदींसह पावसाळ्यातील आजारावर रानभाज्या उपयुक्त आहेत.
◼️ त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या आवर्जून खाल्ल्या पाहिजेत.
◼️ रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
◼️ रक्ताभिसरण व्यवस्थित होते तर काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत.
◼️ रानभाज्यांचा समावेश पावसाळ्याच्या दिवसांत आहारात केल्यास आरोग्यदायी फायदे मिळण्यास मदत होते.

रानभाजीचे नाव : औषधी/पौष्टिक गुण
◼️ चिघळ, घोळ, कडवंची : लोह, खनिजे, जीवनसत्त्वे, रोगप्रतिकारक वाढ.
◼️ अळू, आंबडी, राजगिरा : चयापचय वाढवणे, पचन सुधारणा, थकवा दूर करणे.
◼️ पिंपळ, भुईआवळा : रक्ताभिसरण सुधारते, त्वचेला लाभदायक.
◼️ शेवग्याची पाने : शक्तिवर्धक, अॅण्टिऑक्सिडंट्स मुबलक.
◼️ हदगा, गुळवेल, सराटा : दमा, संधिवात, मधुमेहास उपयुक्त.

रानभाज्या शिजवताना काय काळजी घ्यावी?
आपण बऱ्याचदा भाज्या खूप जास्त शिजवतो, उकडतो. त्यामुळे त्याची चव जरी चांगली होत असली तरी त्या भाज्यांमधील पोषणतत्त्वे मात्र बऱ्याच प्रमाणात कमी होतात.

अधिक वाचा: Ranbhajya: पावसाळ्यात रानभाज्यांची जादू; चवीबरोबरच 'या' रानभाज्यांचा आरोग्यालाही मोठा फायदा

Web Title: Ranbhajya : Be sure to try these healthy wild vegetables that have hit the market this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.