Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > साठ दिवसांत दीड फूटाच्या कणसांची बाजरी; रावसाहेबांना उन्हाळी पिक देतेय दुहेरी फायदा

साठ दिवसांत दीड फूटाच्या कणसांची बाजरी; रावसाहेबांना उन्हाळी पिक देतेय दुहेरी फायदा

Millet with ears of one and a half feet in sixty days; Summer crop gives Raosaheb a double benefit | साठ दिवसांत दीड फूटाच्या कणसांची बाजरी; रावसाहेबांना उन्हाळी पिक देतेय दुहेरी फायदा

साठ दिवसांत दीड फूटाच्या कणसांची बाजरी; रावसाहेबांना उन्हाळी पिक देतेय दुहेरी फायदा

खडकाळ माळरानावर कोतूळात शेतकऱ्याने दीड एकरात बाजरीचे बहारदार पीक घेतले आहे. चक्क दीड फूट उंचीची कणसे लागली आहेत.

खडकाळ माळरानावर कोतूळात शेतकऱ्याने दीड एकरात बाजरीचे बहारदार पीक घेतले आहे. चक्क दीड फूट उंचीची कणसे लागली आहेत.

मच्छिंद्र देशमुख
शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे. असे सर्वश्रुत आहे. मात्र खडकाळ माळरानावर कोतूळात शेतकऱ्याने दीड एकरात बाजरीचे बहारदार पीक घेतले आहे. चक्क दीड फूट उंचीची कणसे लागली आहेत.

कोतूळ येथील शेतकरी रावसाहेब रामनाथ खतोडे यांच्याकडे तीस संकरीत गायींचा गोठा आहे. पशुखाद्याचे वाढते भाव दूध धंद्यात न परवडणारे आहे.

यावर उपाय म्हणून त्यांनी पशुखाद्यासाठी धान्य व चारा म्हणून बाजरीचेपीक घेतले. अत्यंत खडकाळ माळरानावर उन्हाळी हंगामातील वाण पहिल्यांदा पेरले आहे.

खतोडे उच्चशिक्षित असल्याने पेरणी व साठ दिवसांत चार वेळा पाणी दिले. सध्या बाजरीचे पीक साडेचार फूट उंच व कणीस दीड दोन फूट लांब आहे. अजून एक महिन्यात पीक काढणीस तयार होईल.

सदर बाजरी पिकातून धान्य व इतर भागांचा मुरघास बनवयायचा आहे. त्यामुळे पशुखाद्य व चारा असा दुहेरी प्रश्न सुटणार आहे. या माळरानावर हे पीक ये-जा करणाऱ्यांना आकर्षित करीत आहे.

बाजरीत आर्यन, कॅल्शिअम फायबर ही पोषणमूल्य आहेत. मिलेटस म्हणून केंद्र व राज्य सरकार या उत्पादनाला प्रोत्साहन देते आहे. ज्यांना उन्हाळी हंगामात पाणी देण्याची सोय आहे. त्यांनी या पिकाकडे निश्चित वळावे. मी स्वतः खतोडे यांच्या बाजरी क्षेत्रात भेट देणार आहे. - अतुल पवार, तालुका कृषी अधिकारी

अधिक वाचा: पावसाचे निसर्ग संकेत; वाचा निसर्गातील कोणकोणते सजीव कसे देतात पाऊस येण्याचे संकेत?

Web Title : साठ दिनों में बाजरे की फसल से किसान को दोहरा लाभ

Web Summary : कोतुल के किसान रावसाहेब खतोडे ने बंजर भूमि पर पशुओं के चारे के लिए बाजरे की खेती की। यह नवीन दृष्टिकोण बढ़ती हुई चारा लागत को संबोधित करता है और दोहरा लाभ प्रदान करता है। तेजी से बढ़ने वाली, पोषक तत्वों से भरपूर फसल ध्यान आकर्षित करती है और कृषि अधिकारियों द्वारा प्रोत्साहित की जाती है।

Web Title : Sixty-Day Millet Crop Yields Double Benefit for Farmer

Web Summary : Raosaheb Khatode, a farmer in Kotul, cultivates millet on barren land for cattle feed and fodder. This innovative approach addresses rising feed costs and provides dual benefits. The rapidly growing, nutrient-rich crop attracts attention and is promoted by agricultural officials.