मच्छिंद्र देशमुख
कोतुळ : अलीकडे डिजिटल माध्यमे, हवामान तज्ज्ञ, सॅटेलाईट ही साधने पावसाचा अंदाज सांगतात. मात्र, गेल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पाऊस येण्याच्या खुणा आता दिसू लागल्या आहेत.
पुढील २० दिवसांत पाऊस होण्याचे संकेत निसर्ग घटक असलेल्या जीवांनी द्यायला सुरुवात केली आहे. सध्या उष्णता वाढली आहे. मात्र, १ मेपासून हवामान तज्ज्ञांचे अंदाज मोडीत काढून अचानक उष्णता कमी झाली आहे.
दरम्यान, निसर्गात पावसाचे संकेत देणाऱ्या 'नेचर इंडिकेटर्स'ने आता २० दिवसांत पाऊस येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
पावशाचे ओरडणे, पालीची अंडी, वाळवीचे वारूळ बंद करण्याची क्रिया, सापांची वीण, मुंग्यांची हालचाल वाढली आहे.
लवकरच पाऊस येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी हे संकेत पाहून शेतीकामाला लागले आहेत.
असे आहेत निसर्ग संकेत
◼️ सध्या पाली अंडी घालत आहेत. काही ठिकाणी पिलं बाहेर आली. (१० ते २० दिवसांत पाऊस येणार)
◼️ वाळवीने रस्ता, शेत, बांधावरील वारूळ बंद करण्याची सुरुवात केली. (८ ते १० दिवसांत पाऊस)
◼️ सापांची वीण सुरू झाली. (१५ ते २० दिवसांत पाऊस)
◼️ मुंग्यांची रांग लागली, अंडी वहायला सुरुवात. (३ ते ८ दिवसांत पाऊस)
◼️ पावश्या पक्ष्याचे ओरडणे. (१५ ते २० दिवसांत पाऊस)
अधिक वाचा: शेतकरी बांधवांनो कर्जमाफीचा लाभ हवा! तर 'या' कागदपत्राचे आजच प्रमाणीकरण करा
