Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात ११.७० लाख हेक्टरवर खरीप पेरण्या; कोणत्या पिकाची झाली सर्वाधिक पेरणी?

राज्यात ११.७० लाख हेक्टरवर खरीप पेरण्या; कोणत्या पिकाची झाली सर्वाधिक पेरणी?

Kharif sowing on 11.70 lakh hectares in the state; Which crop was sown the most? | राज्यात ११.७० लाख हेक्टरवर खरीप पेरण्या; कोणत्या पिकाची झाली सर्वाधिक पेरणी?

राज्यात ११.७० लाख हेक्टरवर खरीप पेरण्या; कोणत्या पिकाची झाली सर्वाधिक पेरणी?

kharif perani सुमारे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मॉन्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे.

kharif perani सुमारे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मॉन्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे.

पुणे : सुमारे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मॉन्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे.

आतापर्यंत ११ लाख ७० हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. सरासरी क्षेत्राच्या हे प्रमाण आठ टक्के इतके आहे. सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात एकूण क्षेत्राच्या २० टक्के झाल्या आहेत.

सरासरी दीड कोटी हेक्टरवर खरीप पिके
◼️ मुंबई पुणे सोलापूरसह अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सून दाखल राज्यात यंदा मान्सूनचे २५ मे रोजी आगमन झाले. त्यानंतर झाला. त्यामुळे यंदा खरीप पेरण्या लवकर होतील अशी शेतकऱ्यांना आशा लागून होती.
◼️ मात्र, आगेकूच करण्यास स्थिती अनुकूल नसल्याने तब्बल २१ दिवस मान्सून याच पट्ट्यात स्थिरावला.
◼️ गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनची प्रगती सुरू झाली असून विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात सरासरी १ कोटी ४४ लाख ३६ हजार ५४ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात येते.
◼️ खरीप हंगामात कापूससोयाबीन या दोन पिकांखालील सरासरी क्षेत्र अनुक्रमे ४२ लाख व ४७ लाख हेक्टर इतके आहे.

या पिकांच्या झाल्या पेरण्या
◼️ काही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आतापर्यंत राज्यात ११ लाख ७० हजार ३३३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
◼️कापूससोयाबीन लागवडीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३ लाख ९१ हजार ८०९ हेक्टरवर कापूस पिकाची तर ३ लाख २२ हजार ७२५ हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे.
◼️ तर १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर मका, ६६ हजार ८६५ हेक्टरवर बाजरी, २३ हजार २१७ हेक्टरवर भात, ९६ हजार २०० हेक्टरवर तूर, ३४ हजार ६३० हेक्टरवर मूग व ८५ हजार ८५ हजार ५६५ हेक्टरवर उडीद पिकाची लागवड केली आहे.

विभागनिहाय पेरण्यांची स्थिती

विभागसरासरी क्षेत्रपेरणीटक्के
कोकण३९२०६०५२८५१.३५
नाशिक२०३३२५४२४९७३११२.२८
पुणे१२५६४३९२५६०१८२०.३८
कोल्हापूर७२४७७८१०८९८४१५.०४
संभाजीनगर२१४२०२३१०८९९७०५.०९
लातूर२८३०७०५३३९०७७११.९८
अमरावती३१६०८८४८१७३८०२.६२
नागपूर१८९६९१०१९५०३१.०३
एकूण१४४३६०५४११७०३३८.११

अधिक वाचा: तुरीचे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप तीन वाण कोणते? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Kharif sowing on 11.70 lakh hectares in the state; Which crop was sown the most?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.