Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Dudh Dar : राज्यात म्हैस दुधासाठी कुठला संघ देतोय किती दर? वाचा सविस्तर

Dudh Dar : राज्यात म्हैस दुधासाठी कुठला संघ देतोय किती दर? वाचा सविस्तर

Dudh Dar : Which milk dairy is paying what price for buffalo milk in the state? | Dudh Dar : राज्यात म्हैस दुधासाठी कुठला संघ देतोय किती दर? वाचा सविस्तर

Dudh Dar : राज्यात म्हैस दुधासाठी कुठला संघ देतोय किती दर? वाचा सविस्तर

राज्यात दुधाची मागणी वाढत असल्याने गाय व म्हैस दूध खरेदी दरात इतर दूध संघ वाढ करीत असताना, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने मात्र, म्हैस दूध खरेदी दर चार रुपयांनी कमी केले आहे.

राज्यात दुधाची मागणी वाढत असल्याने गाय व म्हैस दूध खरेदी दरात इतर दूध संघ वाढ करीत असताना, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने मात्र, म्हैस दूध खरेदी दर चार रुपयांनी कमी केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अरुण बारसकर
सोलापूर : राज्यात दुधाची मागणी वाढत असल्याने गाय व म्हैस दूध खरेदी दरात इतर दूध संघ वाढ करीत असताना, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने मात्र, म्हैस दूध खरेदी दर चार रुपयांनी कमी केले आहे.

एका लिटरचा चार रुपये खरेदीवर कमी करून सोलापूर जिल्हा दूध संघाने शेतकऱ्यांवर नव्या वर्षात संक्रात आणली आहे. राज्य सरकार गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देत होते, तेव्हा दूध संकलन करणाऱ्या संस्था किमान २८ रुपये दर देत होत्या.

नोव्हेंबरपर्यंत राज्य शासनाकडून गाय दुधाला अनुदान दिल्याने दूध खरेदी दरात वाढ झाली नव्हती, मात्र डिसेंबरअखेरला सोनाई दूध संघाने गाय दुधाला एक रुपयाने वाढ केली व जानेवारीत आणखीन एक रुपयांची वाढ करीत प्रति लिटर ३० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत.

सोनाई नंतर इतर दूध संघाकडूनही गाय दूध खरेदी दर ३० रुपये करण्यात आला आहे. म्हैस दूध खरेदी दर राज्यात सगळीकडेच ४९ रुपयांपेक्षा अधिक दिला जात होता व सध्याही जात आहे.

उलट गोकुळ (कोल्हापूर) दूध संघाने म्हैस (६.५: ९.०) दुधाला ११ जानेवारीपासून ५४ रुपये ८० रुपये दर जाहीर केला आहे.

सोलापूर जिल्हा दूध संघाकडूनही म्हैस दूध खरेदीसाठी प्रति लिटर ४८ रुपये दर दिला जात होता, तो ११ जानेवारीपासून ४४ रुपये करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. गाय दूध खरेदी मात्र, ३० रुपयांनीच केली जात असल्याचे सांगण्यात आले.

दरात तफावत
कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी केवळ म्हशींची जोपासणा करतात. त्यामुळे गोकुळकडून संघ म्हशीच्या ओरिजनल दुधाला ५० रुपये ५० पैसे (६.०:९.०) दर दिला जातो. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व सांगोला परिसरातील दुधाला ४७ रुपये ५० पैसे दर दिला जातो. जिल्हातील बहुतांशी शेतकरी म्हँस दुधात गाईचे दूध मिश्रण करतात, असे सांगण्यात आले.

संघाचे नावम्हैस दूध खरेदी दर
गोकुळ (कोल्हापूर)५० रु. ५० पै.
वारणा (कोल्हापूर)५० रु. ५० पै.
राजाराम बापू संघ४९ रु. ५० पै.
पुणे जिल्हा५० रु. ८० पै.
सोलापूर जिल्हा४४ रु. ०० पै.
अमुल डेअरी४९ रु. ३० पै.
ऊर्जा दूध४९ रु. ५० पै.
सोनाई, इंदापूर४९ रु. ३० पै.

कोल्हापूर जिल्ह्यात म्हशीच्या दुधाचा वाढीव खरेदी दर ६.५ फॅट व ९ एसएनएफसाठी ५४ रु., तर ७ फॅटसाठी ५६ रुपये आहे. मात्र, अधिकृत दरपत्रक आलेले नाही. इतर भागांतील दूध संघाचा ६ फॅट ९ एसएनएफसाठी ४९.५९ रुपये, तर पुढील एक फॅट पॉइंटला ८३ पैसे आहेत. म्हणजे, ७ फॅट दुधाचा खरेदी दर कोल्हापूरमध्ये ५६ रुपये, तर अन्य भागांतील संघ ५७.८९ रुपये दर होतो. - प्रकाश कुतवळ, चेअरमन, ऊर्जा दूध

Web Title: Dudh Dar : Which milk dairy is paying what price for buffalo milk in the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.