Lok Sabha Election 2019; Strong Room Triple Safety | Lok Sabha Election 2019; स्ट्राँग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा
Lok Sabha Election 2019; स्ट्राँग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा

ठळक मुद्देपूर्णवेळ सीसीटीव्हीची नजर : मेटल डिटेक्टर आणि अग्निशमन यंत्रणाही सज्ज

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. मात्र मतमोजणीला दीड महिन्याचा अवधी आहे. तोपर्यंत इव्हीएम मशिन सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम उभारण्यात आली आहे. या स्ट्राँगरूमला त्रिस्तरीय सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले. याशिवाय २४ तास सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. अधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. मेटल डिटेक्टर आणि अग्निशमन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी ११ एप्रिलला मतदान केले. यवतमाळातील दारव्हा मार्गावरील शासकीय गोदामातील स्ट्राँग रूममध्ये इव्हीएम मशिन ठेवण्यात आल्या आहे. हे मतदान एकठ्ठा गोळा करण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री १ वाजेपर्यंत जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाने काम केले.
वाशिममधून येणाºया इव्हीएम मशिन पोहोचण्यास वेळ लागला. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत इव्हीएम मशिन एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात आणल्या गेल्या. यामुळे या ठिकाणची व्यवस्था अधिकच चोख होती. शुक्रवारी रात्री इव्हीएम, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट गोळा करून कंट्रोल रूम सिल करण्यात आली. त्यानंतर ती सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आली.
स्ट्राँग रूम असणाºया ठिकाणी सहा गोदामे आहेत. यातील मोठ्या गोदामात २२०६ इव्हीएम मशिन आणि त्याच्याशी संलग्न यंत्र ठेवण्यात आले आहे. या स्ट्राँग रूमला चारही बाजूंनी शस्त्रधारी पोलिसांचे सुरक्षा कवच आहे. यामध्ये त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा आहे. रेल्वे फोर्सची मुख्य सुरक्षा यंत्रणा स्ट्राँग रूमभोवती आहे. या ठिकाणी ९० शस्त्रधारी पोलीस आहेत. ३० जण आठ तास यानुसार तीन शिफ्टमध्ये ही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सीआरपीएफचे जवान आणि बाहेरील बाजूला राज्याचा पोलीस फोर्स ठेवण्यात आला. एकावेळी ३० कर्मचारी, प्रत्येकाची आठ तास ड्युटी यानुसार तीन शिफ्टमध्ये ही यंत्रणा काम करत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांखेरीज येथे कोणालाही प्रवेश नाही. मेटल डिटेक्टर लावण्यात आले आहे. मोबाईल अथवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस येथे वापरण्यावर बंदी आहे. संपूर्ण यंत्रणेच्या कामकाजावर पहारा ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला त्याची कनेक्टीव्हिटी करण्यात आली आहे.
आतील बाजूला विश्रांतीसाठी पोलिसांचे टेंट लावण्यात आले आहे. त्याच ठिकाणी त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था राहणार आहे. १२ उपजिल्हाधिकारी, ८ तहसीलदार, १ अ‍ॅडिशनल कलेक्टर अशा २१ अधिकाºयांची या कंट्रोल रूमवर नजर राहणार आहे. तेदेखील ही संपूर्ण यंत्रणा आणि स्ट्राँग रूमची पाहणी करणार आहे. या ठिकाणच्या प्रवशेद्वारालाही पडदे लावून बंद करण्यात आले आहे. एकूणच मतमोजणी होईपर्यंत ही संपूर्ण यंत्रणा सुरक्षेचे पालन करणार आहे. विविध विभाग आणि पोलीस सुरक्षाबल या स्ट्राँग रूमची देखरेख करणार आहे. यामुळे या संपूर्ण भागाला पोलीस छावनीचेच रूप आले आहे.

काँग्रेसचा ‘जॅमर’चा प्रस्ताव आयोगाकडे
काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी स्ट्राँग रूमच्या परिसरात जॅमर लावण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. मात्र हा निर्णय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.


Web Title: Lok Sabha Election 2019; Strong Room Triple Safety
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.