Lok Sabha Election 2019; देश सुरक्षित हवा असेल तर युतीला मतदान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 09:51 PM2019-04-08T21:51:35+5:302019-04-08T21:54:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ/वणी : आम्ही राष्ट्रप्रेमाखातर भाजपशी असलेले मतभेद गाडून टाकलेत. भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष एका ...

Lok Sabha Election 2019; If the country is safe, vote for the alliance | Lok Sabha Election 2019; देश सुरक्षित हवा असेल तर युतीला मतदान करा

Lok Sabha Election 2019; देश सुरक्षित हवा असेल तर युतीला मतदान करा

Next
ठळक मुद्देउद्धव ठाकरे : यवतमाळ, वणीत जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ/वणी : आम्ही राष्ट्रप्रेमाखातर भाजपशी असलेले मतभेद गाडून टाकलेत. भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष एका विचाराचे आहेत. देशाची सुरक्षा हवी असेल तर शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारालाच मतदान करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
सोमवारी दुपारी वणी आणि सायंकाळी यवतमाळ येथे उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. भाजप आणि शिवसेना हे दोन वेगवेगळे पक्ष असले तरी त्यांचे विचार एक आहेत. आमच्यात मतभेद असतील. परंतु आमचे कुटुंब एक आहे. त्यामुळे मतभेद बाजुला सारून एक झालो आहोत. यापुढेही ही एकता कायम राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.
कॉंग्रेस आणि भाजप-सेना या दोन्ही पक्षाचे जाहीरनामे बघा. भाजपच्या जाहीरनाम्यात राममंदिर बांधण्याचे अभिवचन आहे. ३७० कलम कधीही रद्द करण्याची ग्वाही या जाहीरनाम्यातून देण्यात आली आहे. कॉंग्रेसने शेतकऱ्यांचा कळवळा दाखवू नये, ईतकी वर्षे कॉंग्रेसने या देशावर राज्य केले. या काळात शेतकऱ्यांचे काय हाल झालेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कॉंग्रेसच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे कॉंग्रेसवाल्यांनी भाजप हा पक्ष लालकृष्ण अडवाणींना कशी वागणूक देत आहे, हे पाहण्यापेक्षा जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयांना आपण कशी वागणूक दिली, याचा विचार करावा. वागणूक कशी द्यायची हे कॉंग्रेसने आम्हाला शिकवू नये, असेही ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात शेतकरी आत्महत्या, वणीतील गोळीबार, गोवारी बांधवांना न्यायालयाने दिलेला न्याय आदी मुद्यांनाही हात घातला. माणिकराव ठाकरेंचे डिपॉझिट जप्त होईल, असेही त्यांनी सांगितले. यवतमाळातील सभेच्या व्यासपीठावर डॉ. दीपक सावंत, ना. संजय राठोड, ना. मदन येरावार, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, प्रकाश डहाके, नगराध्यक्ष कांचन चौधरी, किशोर तिवारी तर वणीतील सभेला ना. हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी आमदार विश्वास नांदेकर, सुरेश सावंत आदी उपस्थित होते.
काँग्रेसचा जाहीरनामा घातक
कॉंग्रेसचा जाहीरनामा अतिशय घातक असून घटनेतील १२४ कलम रद्द करण्याची भाषा केली जात आहे. हे कलम रद्द केल्यास देशद्रोह्यांवर खटले भरता येणार नाहीत. त्यामुळे जे देशद्रोही असतील तेच कॉंग्रेसला मतदान करतील, असे ठाकरे म्हणाले.

Web Title: Lok Sabha Election 2019; If the country is safe, vote for the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.