Next

ना उमेदवार फिरकले... ना कार्यकर्ते....32 मतांसाठी मतदान यंत्रणा तेवढी पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 03:32 PM2019-04-18T15:32:00+5:302019-04-18T15:32:05+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदारसंख्येचे गाव म्हणून भुदरगड तालुक्यातील चिक्केवाडीची नोंद आहे. या ठिकाणी फक्त ३२ मतदान असून; ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदारसंख्येचे गाव म्हणून भुदरगड तालुक्यातील चिक्केवाडीची नोंद आहे. या ठिकाणी फक्त ३२ मतदान असून; त्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा या गावात नेली जाते. तरीही पूर्णक्षमतेने मतदान या ठिकाणी होत नाही. एकंदरीत लोकप्रतिनिधींसह राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे लोकसभेच्या मतदानाबाबत अनास्था आहे.