‘सखी मतदान केंद्र’ ठरले मतदारांचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 03:49 PM2019-04-18T15:49:21+5:302019-04-18T15:50:09+5:30

रिसोड येथील शिवाजी विद्यालयात असलेले सखी मतदान केंद्राने मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते.

'Sakhi voting center' became a Voters' attraction | ‘सखी मतदान केंद्र’ ठरले मतदारांचे आकर्षण

‘सखी मतदान केंद्र’ ठरले मतदारांचे आकर्षण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अकोला लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान करण्यात आले. रिसोड विधानसभा मतदारसंघातील रिसोड येथील शिवाजी विद्यालयात असलेले सखी मतदान केंद्राने मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते. येथे करण्यात आलेली तयारी वाखाण्याजोगी होती.
 या  मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणुकीसाठी कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचारी या महिलाच होत्या. लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र म्हणून याला 'सखी मतदान केंद्र' असे नाव ठेण्यात आले होते. सखी मतदार केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी हे महिलाच होत्या. या मतदान केंद्राला लग्न मंडपासारखे सजविण्यात आले होते. जागोजागी रांगोळी, स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजाविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती.

Web Title: 'Sakhi voting center' became a Voters' attraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.