नालासोपाऱ्यात २२ टक्के उत्तर भारतीय मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:12 PM2019-04-20T23:12:18+5:302019-04-20T23:13:21+5:30

गेल्या लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ विरार येथे आले होते.

22% North Indian votes in Navalpara | नालासोपाऱ्यात २२ टक्के उत्तर भारतीय मते

नालासोपाऱ्यात २२ टक्के उत्तर भारतीय मते

Next

वसई : गेल्या लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ विरार येथे आले होते. नालासोपारा विधानसभा मतदारसंघ पालघर जिल्हातील इतर विधानसभा क्षेत्रापेक्षा मोठा आहे. त्यात ४ लाख ८७ हजार ५६० मतदार असून उत्तर भारतीय मतदार २२ टक्के आहेत. नालासोपारा विधानसभा क्षेत्रावर युतीचा प्रतिस्पर्धी पक्ष बहुजन विकास आघाडी पक्षाचा आमदार क्षितिज ठाकुर आहे. गेल्या पोटनिवडणूकीत उत्तर भारतीय मत भाजपाने आपल्याकडे वळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नालासोपारा पूर्व गालानगर येथे जाहिर सभा घेतली होती. भोजपूरी अभिनेता मनोज तिवारी याला सोबत घेत मुख्यमंत्र्यांनी उत्तर भारतीय मतदारांकडे मतांचा जोगवा मागीतला होता. मात्र, यंदा राजकारणातील तडजोडी बदलल्या असल्याने योगी आदित्यनाथ युतीचे तारणहार असणार आहेत.

Web Title: 22% North Indian votes in Navalpara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.