उत्तर प्रदेशामधील या १२ जागांनी वाढवली भाजपाची डोकेदुखी,  उमेदवारी यादी खोळंबली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 08:45 PM2024-03-27T20:45:02+5:302024-03-27T20:45:59+5:30

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024 : यावेळी भाजपा उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७५ जागांवर निवडणूक लढवणार असून, त्यापैकी ६३ जागांवर भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. तर १२ जागांवरील उमेदवारांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: These 12 seats in Uttar Pradesh have increased BJP's headache, the candidate list has collapsed | उत्तर प्रदेशामधील या १२ जागांनी वाढवली भाजपाची डोकेदुखी,  उमेदवारी यादी खोळंबली

उत्तर प्रदेशामधील या १२ जागांनी वाढवली भाजपाची डोकेदुखी,  उमेदवारी यादी खोळंबली

मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या विजयामध्ये उत्तर प्रदेशमध्ये मिळालेले घवघवीत यश निर्णायक ठरले होते. यावेळीही भाजपाला उत्तर प्रदेशमधून मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. भाजपा उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७५ जागांवर निवडणूक लढवणार असून, त्यापैकी ६३ जागांवर भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. तर १२ जागांवरील उमेदवारांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. यामधील अनेक जागांवर भाजपाचे विद्यमान खासदार आहेत. मात्र पक्षाला काही कारणांमुळे उमेदवार बदलायचे आहेत.

उत्तर प्रदेशमधील ज्या १२ जागांवर भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामध्ये रायबरेली, प्रयागराज, फिरोजाबाद, बलिया, भदोही, देवरिया, कौशांबी, गाझीपूर, मैनपुरी, कैसरगंज, मछली शहर आणि फूलपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. या १२ जागांमध्ये रायबरेली मतदारसंघ हा सर्वात हायप्रोफाईल मतदारसंघ मानला जात आहे. गांधी कुटुंबाचा हा परंपरागत मतदारसंघ असून, सोनिया गांधी ह्या इथून निवडणूक लढवणार नसल्याने येथून  पक्ष कुणाला उमेदवारी देणार याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. काँग्रेसकडून इथे कुणाला उमेदवारी दिली जाईल त्यानंतरच भाजपा इथले आपले पत्ते उघडण्याची शक्यता आहे.

समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या मैनपुरीमध्ये डिंपल यादव ह्या रणांगणात असून, भाजपा यावेळी इथे तगडा उमेदवार देण्याची शक्यता आहे. याशिवाय ब्रिजभूषण सिंह यांचा मतदारसंघ असलेल्या कैसरगंजमध्ये भाजपा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाचा आणखी एक मजबूत मतदारसंघ असलेल्या फिरोजाबादमध्येही भाजपाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. येथे भाजपाचे चंद्रसेन सिंह जादौन हे विद्यमान खासदार आहेत. तर सपाने इथे अक्षय यादव यांना उमेदवारी दिली आहे. त्याबरोबरच पूर्वांचलमधील गाझीपूर, बलिया आणि देवरिया या मतदारसंघातील उमेदवारांबाबतही भाजपामध्ये संभ्रम आहे. 

Web Title: Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: These 12 seats in Uttar Pradesh have increased BJP's headache, the candidate list has collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.