Our brother is dancing unknown reason : Pankaja Munde | बिनवऱ्हाडाच्या वरातीत नाचतोय आमचा भाऊ : पंकजा मुंडे
बिनवऱ्हाडाच्या वरातीत नाचतोय आमचा भाऊ : पंकजा मुंडे

कळंब (जि़उस्मानाबाद) : विरोधकांकडे आता शिलकीतही कोणी राहायला तयार नाही़ बीडमध्ये तर राष्ट्रवादीचे एकमेव आमदार जयदत्त आण्णा होते़ तेही आता आमच्यासोबत आहेत अन् तिकडे आमचा भाऊ उमेदवाराला घोड्यावर बसवून बिनवऱ्हाडाच्या वरातीत एकटाच पुढे पट्टा नाचवीत चालला आहे,  अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी कळंब येथे केली. 

उस्मानाबादमधील महायुतीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ त्यांची कळंबमध्ये सभा झाली़ मुंडे म्हणाल्या, आपल्याकडे जादूची कांडी आहे़ विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असूनही सुरेश धस यांना निवडून आणत याची प्रचीती दिली आहे़ त्यामुळे विरोधकांनी राजकारण आपल्या मर्यादेतच करावे. निधर्मीवादाचे सोंग घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादीच जातीवादाचे राजकारण करतात़ जातींमध्ये भांडणे लावायची़ अल्पसंख्यकांना भडकवायचे, भाजप-सेनेची त्यांना भीती दाखवायची व सत्ता मिळवायची, हाच त्यांचा अजेंडा राहिला आहे़ आम्ही अशा गोष्टीत पडत नाही़ पुढच्या सात वर्षांत मराठवाडा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी ३२ हजार कोटी रुपये खर्चून इस्राईलच्या धर्तीवर पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. 


Web Title: Our brother is dancing unknown reason : Pankaja Munde
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.