लोकसभेच्या प्रचारात नगरसेवक मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:37 AM2019-04-22T02:37:30+5:302019-04-22T02:37:56+5:30

महापालिका क्षेत्र; बैठका, रॅलींवर भर; भाजपची संख्या मात्र कमीच

In the campaigning of the Loksabha corporator in the field | लोकसभेच्या प्रचारात नगरसेवक मैदानात

लोकसभेच्या प्रचारात नगरसेवक मैदानात

Next

- अजित मांडके 

ठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचारासाठी आता काहीच दिवस उरले असून महापालिकेतील नगरसेवकांनी जोर लावण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेसाठी भाजपचे चारच नगसेवक सारखे सारखे दिसत आहेत. तर राष्टÑवादीच्या उमेदवारांकडे मात्र काँग्रेसच्या एकाच नगरसेवकाचे बळ आहे. असे असले तरी इतर पदाधिकारी मात्र सक्रीय झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनीही प्रभागात बैठका, रॅलींवर भर दिला आहे. मात्र, उन्हाच्या तडाख्यामुळे प्रचारात जोर कमी आहे.

ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६५ आणि भाजपचे २३ नगरसेवक आहेत. तर राष्टÑवादीचे ३५ आणि काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. २०१७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली, तर शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरा गेले होते. परंतु , आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपाची युती झाल्याने एकत्रितपणे प्रचार सुरू आहे. लोकसभेची जागा शिवसेनेकडे असल्याने भाजपला त्यांचा प्रचार करावा लागत आहे. परंतु ज्या पद्धतीने सक्रीय होणे अपेक्षित होते. तेवढे ते झालेले नाहीत. दुसरीकडे राष्टÑवादीकडे ३५ नगरसेवक असले तरी या मतदार संघात आठच नगरसेवक येत आहेत.

युतीची स्थिती?
भाजपमध्ये असलेली नाराजी दूर झाली आहे. परंतु, आजही २३ पैकी काही मोजकेच नगरसेवक प्रचारात दिसत आहेत. यामध्ये आमदार संजय केळकरच आघाडीवर असलेल्याचे दिसत आहे. इतर मात्र नगरसेवक भिवंडीत प्रचाराला जातांना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे.

आघाडीची स्थिती?
राष्टÑवादीचे ३५ नगरसेवक असले तरी लोकसभा मतदारसंघात ठाण्यातील केवळ ८ नगरसेवकांचे पाठबळ त्यांना आहे. त्यांच्यावर प्रचार, रॅली, बैठका यांच्यावर जोर द्यावा लागत आहे. तर काँग्रेसचे तीन नगरसेवक असले तरी या मतदारसंघात केवळ एकच नगरसेवक त्यांच्यासाठी उपयोगी ठरत आहे.परंतु, त्याचही हजेरीसुध्दा तुरळक दिसत आहे.

Web Title: In the campaigning of the Loksabha corporator in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.