विवेक दाहियाने पत्नी दिव्यांका त्रिपाठीला दिले खास सरप्राईज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:44 PM2018-08-14T12:44:13+5:302018-08-14T12:50:55+5:30

विवेक सध्या ‘कयामत की रात’ मालिकेत मुख्य भूमिका  साकारत आहे. अनेकदा त्याचे शूटिंग शेड्युअल खूप वेळ सुरू असते त्यामुळे विवेक दहिया यांना एकमेकांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही.

When Vivek surprised wifey Divyanka Tripathi! | विवेक दाहियाने पत्नी दिव्यांका त्रिपाठीला दिले खास सरप्राईज!

विवेक दाहियाने पत्नी दिव्यांका त्रिपाठीला दिले खास सरप्राईज!

googlenewsNext

कामाच्या व्यापात अनेक गोष्टींवर तुम्हाला पाणी सोडावे लागते. सतत कामात बिझी असल्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही भेटणे अशक्यच होते. असेच काहीसे घडले विवेक दहियाबरोबर. मालिकेच्या सेटवर शुटिंग करत असताना त्याला त्याची पत्नी दिव्यांकाला भेटण्याची इच्छा झाली.मग मागचा पुढचा विचार न करता त्याने सरळ दिव्यांकाला भेटण्याचे ठरवले.विवेक असा मध्येच दिव्यांकाला भेटण्यासाठी येणार याची कल्पना कदाचित दिव्यांकालाही नसावी. त्यामुळे विवेकला समोर पाहताच दिव्यांकालाही सुखद धक्काच बसला. नेहमीच दिव्यांकाला खुश ठेवण्यासाठी विवेक अधूनमधुन असे खास सरप्राईज देत असतो. त्यामुळे पुन्हा हे खास सरप्राईज दिव्यांकाला मिळाल्यामुळे तिलाही खूप आनंद झाला.

विवेक सध्या ‘कयामत की रात’ मालिकेत मुख्य भूमिका  साकारत आहे.अनेकदा त्याचे शूटिंग खूप वेळ सुरू असते त्यामुळे विवेक दिव्यांका दोघांनाही एकमेकांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. नेहमीच हे लव्हबर्ड एकमेकांना कधी वेळ देता येणार याच्याच प्रयत्नात असतात. त्यामुळे अशाप्रकारे कामातून वेळ मिळताच अशी धावती भेट देणेही नसे थोडके असेच म्हणावे लागेल.

दोघेही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतात.त्यांच्या कामाव्यतिरिक्तही खाजगी  घडामोडी ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. इतर सेलिब्रेटींप्रमाणे हे कपलही त्यांचे खास फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतात. असाच एक शर्टलेस फोटो विवेकने सोशल मीडियावर शेअर केला होता.या फोटोत त्याची पिळदार बॉडी पाहायाला मिळते आहे. हा फोटो शेअर होताच त्याला खूप सारे कमेंटस आणि लाइक्स मिळाले.  

तर या फोटोला पाहताच काही तरूणींनी त्याला चक्क लग्नासाठी प्रपोज केल्याचे पाहायला मिळाले. या फोटोंवर अनेक तरूणी फिदा होत असून आतापर्यंत 39,639हूनही अधिक लाइक्स या फोटोला मिळाले आहेत. या फोटोवर जास्त कमेंटस या तरूणींच्या आहेत हे पाहून दिव्यांकानेही  ‘ No Touching, No Touching, Only Seeing, Only Seeing’ असा कॉमेडी रिप्लाय दिला. त्यामुळे दिव्यांकापेक्षा विवेक दहियाचा फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत असून सोशल मीडियावर दिव्यांकाच्या नाहीतर पती विवेक दहियाचाच जास्त बोलबाल असल्याचे पाहायला मिळत आहे.
 

Web Title: When Vivek surprised wifey Divyanka Tripathi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.