फॅन्सना सुट्टीच्या दिवशी इथे भेटायचे तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:17 PM2018-07-09T15:17:52+5:302018-07-09T15:19:30+5:30

डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद खाण्याचे शौकीन असल्याचे तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दाखवण्यात आले होते. ते खऱ्या आयुष्यात देखील खाण्याचे शौकीन असल्याने त्यांनी काठी रोल या पदार्थाचे दुकान मीरा रोड आणि मालाड येथे सुरु केले होते.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Dr. Hathi, which means kavi Kumar Azad meet their fan at kathi roll malad | फॅन्सना सुट्टीच्या दिवशी इथे भेटायचे तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद

फॅन्सना सुट्टीच्या दिवशी इथे भेटायचे तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद

googlenewsNext

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे प्रचंड लाडके आहेत. या मालिकेत कवी कुमार आझाद डॉ हाथी ही भूमिका साकारत होते. प्रेक्षकांच्या लाडक्या कवी कुमार यांचे निधन नुकतेच मुंबईत झाले. ते खाण्याचे शौकीन असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले होते. ते खऱ्या आयुष्यात देखील खाण्याचे शौकीन असल्याने त्यांनी काठी रोल या पदार्थाचे दुकान मीरा रोड आणि मालाड येथे सुरु केले होते. कवी कुमार आझाद यांना तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या चित्रीकरणाला सुट्टी असल्यास ते त्यांच्या मीरा रोड येथील दुकानात बसत असत. त्यांना आपल्या फॅन्ससोबत गप्पा मारायला खूप आवडत असत. त्यामुळे ते दुकानात आवर्जून येत असत.
 
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी प्रेक्षकांचे प्रचंड लाडके होते. ही भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांची आज तब्येत बरी नसल्याने ते चित्रीकरणासाठी येऊ शकणार नाहीत असा त्यांनी सकाळी निरोप कळवला होता. त्यांना सकाळ पासूनच अस्वस्थ वाटत होते. घरातच त्यांना हृदय विकाराचा धक्का आल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तिथे त्यांचे निधन झाले.  

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला लवकरच दहा वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने आज एक मीटिंग मालिकेच्या सेट वर आयोजित करण्यात आली होती. पण त्या आधीच हि दुःखद बातमी मालिकेच्या सेट वर आली. त्यांच्या निधनाने मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला आहे. या कार्यक्रमाचे निर्माते असित कुमार मोदी यांना या गोष्टीचा धक्का बसला आहे. ते सांगतात, कवी कुमार आझाद एक चांगले कलाकार आणि व्यक्ती होते. त्यांना बरे नसेल तरी ते चित्रीकरणाला यायचे. आज सकाळी ते येणार नसल्याचा निरोप त्यांनी दिला होता. पण आता जी बातमी आली त्याने आम्हाला सगळयांनाच मानसिक धक्का बसला आहे.

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Dr. Hathi, which means kavi Kumar Azad meet their fan at kathi roll malad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.