रात्रीस खेळ चालेमधील या कलाकाराने दिली प्रेमाची कबुली, जाणून घेऊया कोण आहे हा कलाकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 07:15 AM2019-05-20T07:15:00+5:302019-05-20T07:15:02+5:30

रात्रीस खेळ चाले या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

Ratris Khel chale fame Adish Vaidya in relationship with Vartul fame Revti Lele | रात्रीस खेळ चालेमधील या कलाकाराने दिली प्रेमाची कबुली, जाणून घेऊया कोण आहे हा कलाकार?

रात्रीस खेळ चालेमधील या कलाकाराने दिली प्रेमाची कबुली, जाणून घेऊया कोण आहे हा कलाकार?

googlenewsNext
ठळक मुद्देआदिश रेवती लेले सोबत नात्यात असून त्यानेच इन्स्टाग्रामद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. रेवती ही अभिनेत्री असण्यासोबतच कथ्थक डान्सर असून या दोघांचे अनेक फोटो आपल्याला आदिशच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या सिझनला सध्या प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेतील अण्णा, शेवंता, दत्ता, सविता, काशी, वच्छी या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत काशीचा नुकताच अपघाती मृत्यू झाला असून आता या मालिकेत आता पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले असून या मालिकेला टिआरपी देखील खूपच चांगला आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या सिझनला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. अण्णांच्या घरात खरंच भूत आहे की कोणी घरातील सगळ्यांना उगाचच घाबरवत आहे हे गूढ मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत टिकून होते. या मालिकेतील काही कलाकार सध्या रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.

पण दुसऱ्या सिझनच्या कथानकात अण्णांचा तरुणपणातील काळ दाखवण्यात आला असल्याने माधवची पत्नी, त्याचा मुलगा, दत्ताची मुलं, अभिरामची पत्नी या व्यक्तिरेखा आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. पहिल्या सिझनमध्ये माधवच्या मुलाची म्हणजेच आर्चीसची भूमिका आदिश वैद्यने साकारली होती. त्याला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. रात्रीस खेळ चाले या मालिकेचे फॅन्स त्याला नक्कीच मिस करत आहेत. पण या आदिशच्या बाबतीतील एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आदिश रेवती लेले सोबत नात्यात असून त्यानेच इन्स्टाग्रामद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. रेवती ही अभिनेत्री असण्यासोबतच कथ्थक डान्सर असून या दोघांचे अनेक फोटो आपल्याला आदिशच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात. त्यांच्या पोस्टद्वारे ते एकमेकांवर असलेले प्रेम नेहमीच व्यक्त करत असतात. त्यांच्या चाहत्यांना त्यांची जोडी खूपच आवडत असून ते कमेंटच्या माध्यमातून त्यांना हे नेहमीच सांगत असतात. 

आदिशने रात्रीस खेळ चाले या मालिकेनंतर लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत काम केले होते तर रेवती वर्तुळ या मालिकेत दिसली होती.

 

Web Title: Ratris Khel chale fame Adish Vaidya in relationship with Vartul fame Revti Lele

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.