रणवीर सिंग आणि आलिया भटने चाहत्याच्या विनंतीचा ठेवला मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 08:40 PM2019-02-06T20:40:00+5:302019-02-06T20:40:00+5:30

सुपर डान्सरच्या तिसऱ्या सीझनमध्ये बॉलिवूडचा गली बॉय म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग व क्यूट गर्ल आलिया भटने हजेरी लावली होती.

Ranveer Singh and Alia Bhat on the advice of the fans dance on this stage | रणवीर सिंग आणि आलिया भटने चाहत्याच्या विनंतीचा ठेवला मान

रणवीर सिंग आणि आलिया भटने चाहत्याच्या विनंतीचा ठेवला मान

googlenewsNext


सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनीवरील सुपर डान्सरच्या तिसऱ्या सीझनमध्ये बॉलिवूडचा गली बॉय म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग व क्यूट गर्ल आलिया भटने हजेरी लावली होती. यावेळी रणवीर सिंगच्या चाहत्याने त्याला नृत्य करण्याची विनंती केली आणि रणवीर सिंगने त्याच्या विनंतीचा मान ठेवत डान्स केला. 
स्पर्धक तेजस वर्माच्या शेजार्‍यांनी तिकडे येऊन त्याला सरप्राईज दिले. ते आपल्या आवडत्या अभिनेत्याला तिकडे पाहून खूप खूश झाले आणि आपला उत्साह लपवू शकले नाहीत. त्यांच्यात रणवीरचा एक मोठा चाहता होता, ज्याने रणवीरसोबत नृत्य करण्याची इच्छा व्यक्त केली. प्रोडक्शन टीमला वेळेचे बंधन असल्याने त्यांनी सांगितले की अशी विनंती मान्य करता येणार नाही. आपल्या चाहत्यांचे मन राखण्याबद्दल आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याबद्दल रणवीरची ख्याती आहे आणि त्यास अनुसरून त्याला आपल्या चाहत्याची विनंती डावलावीशी वाटली नाही. रणवीरने टीमला सांगितले की त्याची काहीही हरकत नाही. असे सांगून तो आलियासह मंचावर गेला आणि तेजसच्या शेजार्‍यांसोबत त्याने नृत्य केले.


सेटवरील सूत्राने सांगितले की, “रणवीरला पाहून त्याचे चाहते खूप खूश झाले आणि रणवीरसोबत नृत्य करण्याची आपली इच्छा त्यांनी व्यक्त केली. प्रोडक्शन टीमने अशी विनंती मान्य करता येणार नाही असे सांगितले पण रणवीर आपल्या चाहत्याला नाही म्हणू शकला नाही आणि तेजसच्या शेजार्‍यांसोबत नृत्य करण्यासाठी तो मंचावर पोहोचला. आपल्या चाहत्यांचे मन राखून त्यांना आनंद देण्याची ही रणवीरची कृती स्तुत्य होती.”


रणवीर सिंग आणि आलिया भटने केलेली धमाल सुपर डान्सर सीझन ३ मध्ये या रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहता येईल.

Web Title: Ranveer Singh and Alia Bhat on the advice of the fans dance on this stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.