पूजा बिरारी 'साजणा' मालिकेत साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 08:00 AM2019-04-15T08:00:00+5:302019-04-15T08:00:00+5:30

झी युवा वाहिनीवर 'साजणा' ही नवी मालिका लवकरच दाखल होणार आहे. त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झालेला आहे.

Pooja Barari will play 'only' role in 'Sajna' series | पूजा बिरारी 'साजणा' मालिकेत साकारणार 'ही' भूमिका

पूजा बिरारी 'साजणा' मालिकेत साकारणार 'ही' भूमिका

googlenewsNext

झी युवा वाहिनीवर 'साजणा' ही नवी मालिका लवकरच दाखल होणार आहे. त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झालेला आहे. मालिकेचे ट्रेलर पसंतीस पडत आहे. मालिकेविषयी सर्वांच्याच मनात खूप उत्सुकता आहे. १५ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता 'झी युवा' वाहिनीवर ही मालिका पाहता येईल. या मालिकेतील रमा या मुख्य स्त्री भूमिकेत पूजा बिरारी ही नवी अभिनेत्री पाहायला मिळणार आहे. 


एका छोट्याशा गावात राहणारी, घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे पुरेसे शिक्षण घेऊ न शकलेली पण तरीही स्वाभिमानी अशी ही एक तरुणी आहे. शिक्षण घेण्याची संधी मिळाली नसली, तरीही रमा स्वभावाने बेधडक आहे. तिची स्वप्ने मोठी आहेत. ही स्वप्ने साकार करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असणारी रमा छोट्या पडद्यावर पाहायला प्रेक्षक वर्गाला नक्कीच आवडेल. 'साजणा' या मालिकेत, या जिद्दी मुलीची व एका श्रीमंत घरातील मुलाची प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. 

प्रेमाचे विविधरंग दाखवणारी ही मालिका अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासाठी एक नवी सुरुवात आहे.

प्रथमच छोट्या पडद्यावर काम करणारी पूजा या भूमिकेविषयी बोलताना म्हणाली की, मालिकेतील रमा आणि खऱ्या जीवनातील पूजा या दोघी सारख्याच आहेत. सतत आनंदी राहणे व इतरांनादेखील आनंदी ठेवणे मला खूप आवडते. त्यामुळे ही भूमिका साकारणे फार कठीण गेले नाही. या मालिकेतून पदार्पण करत असल्याने, मनावर दडपण मात्र आहे. कॅमेऱ्यासमोर काम करण्याचा पहिलाच अनुभव आहे. नवीन गोष्टी अनुभवायला व शिकायला मिळत आहेत. 'साजणा'मधील भूमिकेविषयी प्रेक्षकांच्या अभिप्रायाची उत्सुकता व काहीशी भीती अशी संमिश्र भावना माझ्या मनात आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे."
१५ एप्रिल पासून, सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता 'साजणा' ही नवी मालिका पाहायला विसरू नका.

Web Title: Pooja Barari will play 'only' role in 'Sajna' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.