Nyra Banerjee performs an aerial bike stunt for Divya Drishti | नीरा बॅनर्जीने 'दिव्य दृष्टी' मालिकेत केला थरारक स्टंट
नीरा बॅनर्जीने 'दिव्य दृष्टी' मालिकेत केला थरारक स्टंट

स्टार प्लस’ वाहिनीवरील 'दिव्य दृष्टी' या मालिकेत दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री नीरा बॅनर्जी हिने आपल्या धाडसी प्रसंगांनी प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. मालिकेतील आपल्या जोरदार व्यक्तिरेखेबरोबरच तिने आता प्रेक्षकांना एक थरारक स्टंट प्रसंग साकारून चकित केले आहे.

दिव्याची व्यक्तिरेखा ही तशी धडाडीची आणि बिनधास्त स्वभावाची असून या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा निश्चय नीरा बॅनर्जीने केला आहे. तिला बाइक चालविण्याची खूप हौस होती आणि आता दिव्य दृष्टी मालिकेत तिची ही इच्छा पूर्ण होत आहे. यासंदर्भात नीराने सांगितले, 'बाइक चालवायला मी शिकले असले, तरी प्रत्यक्ष ती चालविण्याची संधी मला मिळाली नव्हती. आता दिव्य दृष्टी मालिकेमुळे मला ही संधी तर मिळालीच, शिवाय मला त्यात एक स्टंट प्रसंगही साकारण्याची संधी मिळाली. सुरुवातीला मी मनातून खूप धास्तावले होते, पण हा स्टंट प्रसंग स्वत:च साकारण्याचा मी मनाशी निश्चयही केला होता. तो पार पडल्यावर एका थरारक प्रसंगाचा मी अनुभव घेतला. मी हा प्रसंग पार पाडला, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला केवळ बाइक चालवायलाच मिळेल असे नव्हे, तर त्यावर स्टंटही करायला मिळेल, असे वाटलेदेखील नव्हते. मला या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा असल्याने भविष्यातही जर काही स्टंट प्रसंग असले, तरी ते मीच साकारणार आहे.'


नीराचे हे स्टंट छोट्या पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.


Web Title: Nyra Banerjee performs an aerial bike stunt for Divya Drishti
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.