...मी एक अभिनेत्री म्हणूनच प्रेक्षकांच्या स्मरणात राहीन - तेजस्वी प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 01:35 PM2018-11-05T13:35:23+5:302018-11-05T13:38:51+5:30

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या स्टार प्लसवरील ‘कर्णसंगिनी’ या पौराणिक-रोमँटिक मालिकेत राजकन्या उरुवीची भूमिका रंगवीत आहे

... I will remember the audience as an actress - Tejasvi Prakash | ...मी एक अभिनेत्री म्हणूनच प्रेक्षकांच्या स्मरणात राहीन - तेजस्वी प्रकाश

...मी एक अभिनेत्री म्हणूनच प्रेक्षकांच्या स्मरणात राहीन - तेजस्वी प्रकाश

googlenewsNext
ठळक मुद्देतेजस्वी प्रकाश दिसणार ‘कर्णसंगिनी’ मालिकेततेजस्वी प्रथमच दिसणार पौराणिक मालिकेत

वैशिष्ट्यपूर्ण भूमिका रंगविण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या स्टार प्लसवरीलकर्णसंगिनी’ या पौराणिक-रोमँटिक मालिकेत राजकन्या उरुवीची भूमिका रंगवीत आहे. आपल्या आकर्षक आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांवर आपली छाप टाकणाऱ्या तेजस्वी प्रकाशने राजकन्या उरुवीच्या भूमिकेतूनही आपला ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटविला आहे.


तेजस्वी प्रथमच एका पौराणिक मालिकेत भूमिका रंगवीत असून त्यामुळे ती या भूमिकेसाठी खूपच उत्सुक बनली आहे. “मी आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या असून यापुढेही मी ते करीत राहीन. त्यामुळे मला वाटत नाही की प्रेक्षक मला एका ठराविक पद्धतीच्या भूमिकेच्या साच्यात बसवतील. मी एखादी विशिष्ट व्यक्तिरेखा म्हणून नव्हे, तर एक अभिनेत्री म्हणूनच प्रेक्षकांच्या स्मरणात राहीन. यामुळे माझे मन आदरने भरून जाते. प्रेक्षकांनी मला आतापर्यंत विविध भूमिकांमध्ये पाहिले असून या भूमिका अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. असे असूनही प्रेक्षकांनी माझ्यावर प्रेमाचा उदंड वर्षाव केला आहे. एक अभिनेत्री म्हणून मला स्वत:ला विविध आव्हाने पेलण्यास आवडतात आणि भविष्यातही मी विविध प्रकारच्या भूमिका स्वीकारीत राहीन,” असे तेजस्वी म्हणाली.
कर्णसंगिनीतील आपल्या भूमिकेविषयी तेजस्वी म्हणाली, “उरुवी ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा असून तिच्याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. त्यामुळे ही व्यक्तिरेखा उभी करताना अजूनच मजा येईल. ती केवळ कर्णाची पत्नी नाही; ती एक कणखर व्यक्तिमत्त्वाची मुलगी असून एक योध्दाही आहे. ही मालिकाच मुळात अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि प्रेक्षकांनाही महाभारतातील या अज्ञात पैलूची कथा पाहणे रंजक वाटेल, याची मला खात्री आहे.”
 

Web Title: ... I will remember the audience as an actress - Tejasvi Prakash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.