'नजर'मध्ये हर्ष राजपूत दिसणार 'या' भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 02:53 PM2018-08-07T14:53:21+5:302018-08-08T06:30:00+5:30

स्टारप्लसवरील 'नजर'मध्ये हर्ष राजपूत अंश राठोडची भूमिका करत असून त्याच्या ह्या वेगळ्‌या भूमिकेमुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळत आहे.

Harsha Rajput will appear this role in nazar | 'नजर'मध्ये हर्ष राजपूत दिसणार 'या' भूमिकेत

'नजर'मध्ये हर्ष राजपूत दिसणार 'या' भूमिकेत

googlenewsNext
ठळक मुद्देहर्ष दावांश दोन वेगवेगळ्या रुपात दिसणार आहे

स्टारप्लसवरील 'नजर'मध्ये हर्ष राजपूत अंश राठोडची भूमिका करत असून त्याच्या ह्या वेगळ्‌या भूमिकेमुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळत आहे. तो दावांश अर्धा मनुष्य आणि अर्धा डायन असून त्याला सुपरनॅचरल लूक देण्यासाठी निर्मात्यांनी कुठलीही कसर बाकी सोडलेली नाहीये.

सूत्रांनी सांगितले, “हर्ष दावांश साकारत असून त्यासाठी बरीच तयारी करावी लागते. अंशची दोन वेगळी रूपे आहेत. एक साधा मुलगा आणि एक दावांश. निर्मात्यांना त्याच्या लूकबद्दल अजिबात तडजोड करायची नव्हती त्यामुळे त्यांनी खास अंशसाठी स्पेशल इफेक्ट्‌स मेकअप आर्टिस्टची तरतूद केली आहे. मेकअप आर्टिस्ट त्याच्या ऑनस्क्रीन सुपरनॅचरल व्यक्तिरेखेच्या लूकसाठी निदान ३ तास व्यतीत करतात.”

स्टारप्लसवरील नजर हे आधुनिक भारतातील एक सुपरनॅचरल फँटसी नाट्‌य असून आपल्या सभोवताली असलेल्या सुपरनॅचरलच्या काळ्‌या शक्तींबद्दल आणि त्याचा राठोड परिवारावर कसा परिणाम होतो याबद्दल बोलते. अनेक व्यक्तिरेखा आणि स्पेशल इफेक्ट्‌ससह प्रेक्षकांना ह्या भीतीदायक रोलर कोस्टर राईडचा अनुभव घेता येईल.आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक भूमिका निभावलेला हर्ष आता एका वेगळ्‌या रूपात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येणार आहे. या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची (हडळीची) नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखवण्यात आले आहे. 

Web Title: Harsha Rajput will appear this role in nazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nazarनजर