‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो पाहून चाहते बेभान!! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 15:53 IST2018-07-22T15:43:09+5:302018-07-22T15:53:46+5:30

‘कसौटी जिंदगी की’ हा एकेकाळी गाजलेला शो पुन्हा एकदा परतणार आहे. एकता कपूर ही मालिका नव्या रूपात प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय.

ekta kapoor serial kasauti zindagi kay new promo release | ‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो पाहून चाहते बेभान!! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस!!

‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो पाहून चाहते बेभान!! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस!!

‘कसौटी जिंदगी की’ हा एकेकाळी गाजलेला शो पुन्हा एकदा परतणार आहे. एकता कपूर ही मालिका नव्या रूपात प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय. साहजिकच या शोच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या ‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो व्हिडिओ रिलीज होताच, चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. काल एकताने ‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो रिलीज केला. ‘पुन्हा एकदा एक शानदार प्रेम कहाणी घेऊन येतेय. मी प्रचंड उत्साहित आहे,’ असे तिने लिहिले. हा प्रोमो रिलीज झाला आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. केवळ इतकेच नाही तर चाहत्यांचा आनंद जणू गगणात मावेनासा झाला. 



 

‘मी लहान होते, तेव्हा ही मालिका बघायचे आता मी पुन्हा नव्याने ही मालिका बघू शकेल,’ असे एका युजरने लिहिले. ‘‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिलेत. या मालिकेचा दुसरा भाग येतो आहे, हे ऐकून मी किती आनंदी आहे, हे मी सांगू शकत नाही, असे एका चाहतीने लिहिले़.
‘कसौटी जिंदगी की’मध्ये अभिनेत्री श्वेता तिवारी हिने प्रेरणाची भूमिका साकारली होती. तर सिजेन खान अनुरागच्या भूमिकेत दिसला होता. या दोन्ही भूमिका चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या होत्या. २००१ मध्ये आलेली ही मालिका तब्बल ९ वर्षे सुरू होती. ‘कसौटी जिंदगी की2’मध्ये प्रेरणाची व्यक्तिरेखा अभिनेत्री ऐरिका फर्नांडिस साकारताना दिसणार आहे. पण अनुरागची भूमिका कोण साकारणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. हा प्रोमो पाहून अनुराग व प्रेरणाच्या रोमान्सच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Web Title: ekta kapoor serial kasauti zindagi kay new promo release