Bigg Boss Marathi Winner : स्वप्न सत्यात! मेघा धाडे ठरली ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 10:06 PM2018-07-22T22:06:29+5:302018-07-23T07:08:28+5:30

Bigg Boss Marathi Winner: आपल्या असण्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जान’ आणणारी मेघा धाडे ही ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. पुष्कर जोग याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

 Dream come true! Bigg Boss' first winner of Megha Rally !! | Bigg Boss Marathi Winner : स्वप्न सत्यात! मेघा धाडे ठरली ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती!!

Bigg Boss Marathi Winner : स्वप्न सत्यात! मेघा धाडे ठरली ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती!!

googlenewsNext

मैत्री, भांडण, प्रेम, वाद, विरोध, विविधांगी टास्क आणि आठवड्याच्या शेवटी रंगणारा विकेंडचा डाव, ‘बा’चा टीव्ही अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रीय शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर तो क्षण आलाच. आपल्या असण्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जान’ आणणारी मेघा धाडे ही ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. पुष्कर जोग याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

स्मिता गोंदकर, पुष्कर जोग, सई लोकूर, आस्ताद काळे, यांना मात देत मेघा धाडे हिने ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. आज रंगलेल्या अंतिम फेरित शर्मिष्ठा राऊत प्रथम बाद झाली. पाठोपाठ आस्ताद काळे आणि सई लोकूर अंतिम फेरितून बाहेर पडले. यानंतर उरलेत ते केवळ मेघा, पुष्कर अन् स्मिता. या तिघांमध्ये चुरस होती. विशेषत: मेघा आणि पुष्कर यांच्यात अगदी काट्याची टक्कर होती. अखेर तो क्षण आला आणि ‘बिग बॉस मराठी’ची विजेती म्हणून मेघाचे नाव जाहिर करण्यात आले.

मेघाने ‘बिग बॉस मराठी’चा पिहिल्या आठवड्यापासूनच मेघा ही ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानली जात होती. किंबहुना शो जिंकायचाच याच महत्त्वाकांक्षेने मेघा या घरात आली होती. सुरुवातीपासूनच या दूरदृष्टीने मेघाचा खेळ सुरू होता. ‘बिग बॉस’च्या १०० दिवसांच्या वास्तव्यात मेघावर अनेक आरोप झालेत. ती बडबडी आहे, ती खोटारडी आहे, ती अप्रामाणिक आहे, असे अनेक आरोप तिने झेलले. ज्या सई व पुष्कर या ‘बिग बॉस’च्या घरातील तिच्या सर्वाधिक जवळच्या मित्रांनीही तिच्यावर हे आरोप केलेत. पण मेघा या आरोपांना पुरून उरली. मेघा, तू ‘बिग बॉस’च्या घरात ‘जान’ आणलीस, हे महेश मांजरेकर यांचे शब्द तिने अक्षरश: खरे ठरवलेत आणि सरतेशेवटी पुष्कर जोग,रेशम टिपणीस, आस्ताद काळे सारख्या दावेदारांना बाजूला सारत ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आपल्या नावावर केली.

रविवारी संध्याकाळी सात वाजता ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनालेच्या रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात झाली. महेश मांजरेकर यांनी खुमासदार शैलीतून स्पर्धकांशी संवाद साधला. यानंतर मेघासह फिनालेत पोहोचलेल्या सहा स्पर्धकांचे धमाकेदार डान्स झालेत. सई आणि पुष्कर यांची केमिस्ट्री यावेळी पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळाली. मेघा व शर्मिष्ठा या दोघींनी पिंगा गं पोरी पिंगा...वर ठेका धरला. रेशम टिपणीसने खल्लास आणि नागीन...नागीन...ग़ाण्यावर ताल धरला. जुई गडकरी, ऋतुजा, राजेश श्रृंगारपुरे, सुशांत शेलार यांचेही दमदार परफॉर्मन्स झालेत. या परफॉर्मन्सशी शोची रंगत वाढत नेली तशीच उत्कंठाही शिगेला पोहोचवली आणि शेवटी ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या पर्वाच्या विजेत्याच्या नावाची घोषणा झाली आणि सगळ्यांनीच जल्लोष केला.

‘बिग बॉस मराठी’चे पहिले पर्व प्रचंड लोकप्रीय ठरले. विविध कारणांनी ‘बिग बॉस मराठी’चे घर चर्चेत राहिले. घरातील सदस्यांमधले वाद, प्रेम प्रकरणे, मैत्री अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या घरातील प्रत्येक सदस्य जिद्दीने टास्क खेळला. या टास्कमधील भांडणे आणि वादही तेवढेच गाजलेत.

Web Title:  Dream come true! Bigg Boss' first winner of Megha Rally !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.