दिव्यांका त्रिपाठीला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करियर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:38 PM2018-07-16T17:38:39+5:302018-07-17T07:00:00+5:30

दिव्यांका त्रिपाठीला आज छोट्या पडद्यावरची सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री मानले जाते. पण तिला हे यश मिळवणे सोपे नव्हते. तिने तिच्या करियरमध्ये खूप स्ट्रगल केला आहे.

Diwali did not require Tripathi to act in this area but the career | दिव्यांका त्रिपाठीला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करियर

दिव्यांका त्रिपाठीला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करियर

googlenewsNext

दिव्यांका त्रिपाठीची बनू मैं तेरी दुल्हन या मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली होती. सध्या ती ये है मोहोब्बते या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. या मालिकेतील इशिताची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. दिव्यांकाने तिच्या अभिनय प्रवासाविषयी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे. आज तिला छोट्या पडद्यावरची सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री मानले जाते. पण तिला हे यश मिळवणे सोपे नव्हते. तिने तिच्या करियरमध्ये खूप स्ट्रगल केला आहे. स्ट्रगलविषयी ती सांगते, मी कधीच अभिनेत्री बनण्याचा विचार केला नव्हता. मला नेहमीच आर्मी ऑफिसर बनायचे होते. मी शाळेत असताना एनसीसीमध्ये होते. मी रायफर शूटिंगमध्ये देखील तरबेज होती. या सगळ्यामुळे मी आर्मीमध्येच भरती व्हावे असे मला वाटत होते. पण मी सहज म्हणून एका रिअॅलिटी शो मध्ये भाग घेतला होता. त्यातील माझा परफॉर्मन्स पाहून मला एका ऑडिशनसाठी फोन आला आणि अशाप्रकारे माझ्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाला. बनू मैं तेरी दुल्हन ही माझी पहिलीच मालिका प्रचंड यशस्वी ठरली. ही मालिका केवळ सहा महिने चालेल असे मला वाटले होते. त्यामुळे ही मालिका संपल्यावर मी युपीएससीचा अभ्यास करेन असे मी ठरवले होते. पण ही माझी मालिका जवळजवळ तीन वर्षं चालली. या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले असले तरी या मालिकेनंतर मला कोणताही निर्माता काम द्यायला तयार नव्हता. या मालिकेतील विद्या ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात ताजी असल्याने प्रेक्षक मला दुसऱ्या कोणत्याही भूमिकेत स्वीकारणार नाही असेच सगळ्यांना वाटत होते. त्यामुळे माझी ही इमेज बदलण्यासाठी मी एका कॉमेडी मालिकेत काम केले. पण त्यानंतर देखील मला काम मिळत नव्हते. मला केवळ तीन मिनिटांच्या ऑडिशनसाठी देखील लोक तीन पानाचे स्क्रिप्ट वाचायला लावत असत. या सगळ्यामुळे मी कंटाळले होते. अभिनयक्षेत्रात मला यश मिळणार नाही असे वाटत असतानाच मला ये है मोहोब्बते या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि या मालिकेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलले. 
 

Web Title: Diwali did not require Tripathi to act in this area but the career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.