हिना खानला मिळालं खास सरप्राईज, वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 16:52 IST2018-10-01T16:48:00+5:302018-10-01T16:52:30+5:30

या फोटोंमध्ये हिना आनंदी आणि उत्साही असल्याचे दिसून येत आहे. हिनाच्या या वाढदिवस सेलिब्रेशनच्या फोटोंवर रसिकांकडूनही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Birthday celebrations have started for Kasautii Zindagii Kay 2 actress Hina Khan | हिना खानला मिळालं खास सरप्राईज, वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

हिना खानला मिळालं खास सरप्राईज, वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अक्षरा म्हणजेच हिना खानची सध्या आज मै ऊपर आसमाँ निचे अशी अवस्था झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण आता पर्यंत अक्षरा म्हणूनच ओळकली जाणारी हिना आता नव्या इमेज बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच की काय कसौटी जिंदगी की मालिकेत कोमोलिका या भूमिकेत ती झळकणार आहे. नुकताच तिचा कोमोलिका हा लूक समोर आला आहे. तिच्या या नवीन लूकला रसिकांची चांगली पसंती मिळत आहेत. 2 ऑक्टोबरला हिनाचा  हिचा वाढदिवस असतो. मोठ्या उत्साहात रसिकांनीही हिनाचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांनी हिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या घरीही तिचा ३1 वा वाढदिवस दणक्यात सेलिब्रेट करण्यात आला. 

या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो खुद्द हिनानेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंड रॉकीकडूनखास गिफ्टसुद्धा मिळालं आहे. हेच गिफ्ट हातात घेतलेला फोटोही यांत पाहायला मिळतो आहे. या फोटोंमध्ये हिना आनंदी आणि उत्साही असल्याचे दिसून येत आहे. हिनाच्या या वाढदिवस सेलिब्रेशनच्या फोटोंवर रसिकांकडूनही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

'कसौटी जिंदगी की' मालिकेच्या ट्रेलरमध्ये हिना खानचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. कोमोलिकाचा लुक इंडो-वेस्टर्न ठेवण्यात आला आहे.मुळात कोमोलिका या व्यक्तिरेखेसाठी हटके स्टाइल असावी असे एकता कपूरचे इच्छा होती. जवळपास 7 डिझायनर्सना एकता कपूरने रिजेक्ट केले होते. कोमोलिकाच्या ड्रेसिंगपासून ते मेकअपपर्यंत सगळ्याच गोष्टीत बारकाईने एकता कपूरने लक्ष दिले आहे. आता कोमोलिकाची पहिली झलक समोर आल्यावर रसिकही यांवर संमिश्र प्रतिक्रीया देताना दिसतायेत.मुळात एकता कपूरसाठी 'कसौटी जिंदगी की 2' हा खूप महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्यामुळे  डायरेक्शन, एडिटिंग, स्क्रिप्टिंग आणि साउंड क्वालिटीवर एकता स्वतःहुन लक्ष देत आहे. 


पूर्वी 'कसौटी जिंदगी' मालिकेत  उर्वशी ढोलकियाने कोमोलिकाही भूमिका साकारली होती. आजही उर्वशीला पाहाताच कोमोलिका ही इमेज रसिक विसरलेले नाहीत.इतक्या वर्षानंतरही कोमोलिकाची जादु कायम असल्याचे वारंवार पाहायला मिळते.या मालिकेत गाजलेले निगेटीव्ह कॅरेक्टर कोमोलिकाच्या भूमिकेत हिना खान तर श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही भूमिका  एरिका फर्नांडिस साकारणार असून अनुरागच्या भूमिकेत पार्थ समंथन झळकणार आहे.

Web Title: Birthday celebrations have started for Kasautii Zindagii Kay 2 actress Hina Khan