बिग बॉस मराठी सिझन २ : अनोखे कार्य, “पाणी जपून वापरा” च्या माध्यमातून सदस्य देणार एक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 03:36 PM2019-06-14T15:36:55+5:302019-06-14T15:45:39+5:30

हे कार्य दोन टीम मध्ये रंगणार आहे, जी टीम सगळ्यात जास्त पाण्याची बचत करेल ती टीम विजेती ठरेल.

Big Boss Marathi Season 2: A Message That Will Give Members Through Unique Task | बिग बॉस मराठी सिझन २ : अनोखे कार्य, “पाणी जपून वापरा” च्या माध्यमातून सदस्य देणार एक संदेश

बिग बॉस मराठी सिझन २ : अनोखे कार्य, “पाणी जपून वापरा” च्या माध्यमातून सदस्य देणार एक संदेश

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरात आज “पाणी जपून वापरा” हा टास्क रंगणार आहे. महाराष्ट्रातील बरेच प्रदेश पाणी टंचाई सारख्या गंभीर परिस्थितीला सामारे जात आहेत. बिग बॉसच्या घरात २४ तास पाणी पुरवठा होतो परंतु या परिस्थितीची प्रत्येक सदस्याला जाणीव असणे आवश्यक असल्याने आज घरात पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात येणार आहे. आणि यासाठीच पाण्याचे नियोजन कसे करावे याचा प्रत्यय सदस्यांना येणे महत्वाचे आहे. आणि म्हणूनच पाणी जपून वापरा हे कार्य सदस्यांवर सोपवण्यात येणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये रंगणार आहे, जी टीम सगळ्यात जास्त पाण्याची बचत करेल ती टीम विजेती ठरेल.

नेहा आणि माधवमध्ये वाद...

अभिजीत बिचुकलेंमुळे आज नेहा आणि माधवमध्ये वाद होणार आहे. बिग बॉस यांनी आज घरातला पाणीपुरवठा बंद करणार अशी घोषणा केली. ही घोषणा होताच घरामध्ये गोंधळ उडाला. यामध्ये अभिजीत बिचुकलेंचा गोंधळ वेगळाच. घोषणा होताच बिचूकलेंनी लगेच बिग बॉसना विनंती केली कि, थोडा वेळ फ्रेश होण्यासाठी द्यावा.बिचुकले स्टोर रूममध्ये पाणी घेण्यास पोहचले. यावर नेहाने बिचुकलेंना बजावले असं करू नका पण ऐकत नाही हे बघितल्यावर तिने माधवला बिचुकले यांना समजविण्याची विनंती केली. माधवने त्यांना समजावले जारमधल सगळ पाणी संपवू नका तुम्हाला पाणी आत ठेवण्यास परवानगी नाहीये. माधव बिचुकले यांना समजावत असताना नेहा परत मध्ये बोलल्याने माधवला राग आला आणि त्याचा आवाज चढला.  माधवने बिचुकलेना ते नियम मोडत असल्याचे सांगितले. आता अभिजीत बिचुकले नियम मोडणार कि माधवच ऐकणार हे कळेल.

Web Title: Big Boss Marathi Season 2: A Message That Will Give Members Through Unique Task

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.