Big Boss Marathi 2 : बिग बॉस मराठीच्या घरात या स्पर्धकांमध्ये फुलतेय प्रेमकथा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 17:49 IST2019-06-04T17:41:42+5:302019-06-04T17:49:42+5:30

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधील राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा झाली होती

Big Boss Marathi 2 contestant Parag kanhere and Rupali Bhosale love each other? | Big Boss Marathi 2 : बिग बॉस मराठीच्या घरात या स्पर्धकांमध्ये फुलतेय प्रेमकथा?

Big Boss Marathi 2 : बिग बॉस मराठीच्या घरात या स्पर्धकांमध्ये फुलतेय प्रेमकथा?

ठळक मुद्देपराग हा घटस्फोटीत असून त्याच्या पूर्वपत्नीसोबतच्या नात्याविषयी त्याला रूपालीला पूर्णपणे कल्पना दिली आहे. एवढेच नव्हे तर रूपाली नेलपॉलिश लावत असताना तिच्या पायांच्या बोटांना पराग नेलपॉलिश लावून देताना दिसला.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनला खूपच चांगला टिआरपी मिळाला होता. पहिल्या सिझनमधील स्पर्धकांमधील वाद तर चांगलेच गाजले होते. पण त्याहीपेक्षा या सिझनमधील राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा झाली होती. यामुळे हा रिअॅलिटी शो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला होता. विशेषत: राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्यातील रोमान्स अक्षरश: मर्यादांचे उल्लंघन करणारा असल्याने प्रेक्षकांमध्ये त्यांच्याविषयी काहीसा विरोधाचा सूर आवळला  होता.

बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नावाची घोषणा झाल्यापासूनच आताच्या सिझनमध्ये कोणत्या स्पर्धकांची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार अशी चर्चा रंगली होती. आता नुकत्याच झालेल्या प्रसारित झालेल्या भागांमध्ये प्रेक्षकांना एक प्रेमकथा फुलताना दिसत आहे. या कार्यक्रमात पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले यांच्यातील संवाद पाहाता डाल में कुछ काला है असे आता लोकांना वाटायला लागले आहे. 

पराग हा प्रसिद्ध शेफ असून रुपाली ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठी सोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. बडी दूर से आएं है ही तिची सुमीत राघवनसोबतची मालिका प्रचंड गाजली होती. पराग आणि रूपाली यांच्यात बिग बॉसच्या घरात खूपच चांगली मैत्री झाली असून परागने नुकतेच त्याच्या भूतकाळाविषयी देखील रूपालीला सांगितले आहे. पराग हा घटस्फोटीत असून त्याच्या पूर्वपत्नीसोबतच्या नात्याविषयी त्याला रूपालीला पूर्णपणे कल्पना दिली आहे. एवढेच नव्हे तर रूपाली नेलपॉलिश लावत असताना तिच्या पायांच्या बोटांना पराग नेलपॉलिश लावून देताना दिसला.

बिग बॉसच्या टास्कमध्ये देखील ते एकमेकांना खूप समजून घेताना दिसत आहेत. रूपालीला नॉमिनेशन टास्कपासून वाचवण्यासाठी त्याने वैशाली माडेला विनंती केली होती. एवढेच नव्हे तर त्याने वैशालीसोबत याबाबत डील देखील केली होती की, तो नेहाला वाचवेल आणि तिने रुपालीला वाचवावे... आता हे सगळे पाहून पराग आणि रुपाली यांच्यात मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक असल्याची चर्चा रंगली आहे. 

Web Title: Big Boss Marathi 2 contestant Parag kanhere and Rupali Bhosale love each other?