Solapur Lok Sabha Election 2024 :आमदार प्रणिती शिंदेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 06:28 PM2024-04-08T18:28:29+5:302024-04-08T18:30:26+5:30

Solapur Lok Sabha Election 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.

Solapur Lok Sabha Election 2024 Code of Conduct violation complaint against MLA Praniti Shinde | Solapur Lok Sabha Election 2024 :आमदार प्रणिती शिंदेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; नेमकं प्रकरण काय?

Solapur Lok Sabha Election 2024 :आमदार प्रणिती शिंदेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; नेमकं प्रकरण काय?

Solapur Lok Sabha Election 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते यांच्यात लढत सुरू आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.  सोलापूर शहरात विनापरवाना वाहनांवर बॅनर आणि डिजिटल लावण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

मोठी बातमी: प्रकाश आंबेडकर, महादेव जानकरांना मिळालं नवं निवडणूक चिन्ह

आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात वैभव बिराजदार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. 

तक्रारीत नेमकं काय?

आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रार आचारसंहिता कक्षाच्या प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे केली आहे. यावर तात्काळ कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे आदेश कुंभार यांनी सहायक निर्णय अधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

"सोलापूरात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. मात्र, सोलापूर शहरातील रिक्षांवर क्रमांक एम एच १३ बी व्ही १६२८, एमएच १३ जी ९६८०)  परवानगी न घेता डिजिटल बॅनर लावण्यात आले आहेत. त्या बॅनरवरील संपर्क क्रमांक  ७०६६६२४२२२ हा डायल केल्यावर कॉलर आयडीवर काँग्रेस उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव आढळून येत आहे. 

यासह सोलापूर सोशल फोरमने शहरातील महापौर बंगला, सात रस्ता चौक, शासकीय विश्रामगृह संरक्षण आवार, रंगभवन चौक, नर्मदा हॉस्पिटल, डफरीन चौक, नवल पेट्रोल पंपानजीक या ठिकाणीही विनापरवाना डिजिटल लावून आचारसंहितेचे उल्लंघन केले. यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या तक्रारीत केली आहे.  

Web Title: Solapur Lok Sabha Election 2024 Code of Conduct violation complaint against MLA Praniti Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.