कऱ्हाड तालुक्यात काळगावला मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:46 PM2019-04-23T13:46:52+5:302019-04-23T13:49:07+5:30

कऱ्हाड तालुक्यातील दक्षिणला ३१० तर उत्तरला ३३८ मतदान केंद्रावर मतदानास गावागावातील तरुण, वयोवृद्ध मतदारांनी मतदानास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात सकाळी सात ते नऊ यावेळेत कऱ्हाड उत्तरेत ६.६२ टक्के मतदान झाले तर कऱ्हाड दक्षिणेत ६.२० टक्के मतदान झाले.

Machine fault in Kalgaav polling station in Karhad taluka | कऱ्हाड तालुक्यात काळगावला मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड

कऱ्हाड तालुक्यात काळगावला मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड

Next
ठळक मुद्देकऱ्हाड तालुक्यात काळगावला मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड ग्रामीण भागात तरुण-वयोवृद्धांत उत्साह

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील दक्षिणला ३१० तर उत्तरला ३३८ मतदान केंद्रावर मतदानास गावागावातील तरुण, वयोवृद्ध मतदारांनी मतदानास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात सकाळी सात ते नऊ यावेळेत कऱ्हाड उत्तरेत ६.६२ टक्के मतदान झाले तर कऱ्हाड दक्षिणेत ६.२० टक्के मतदान झाले.

काळगाव येथे मतदानास सुरुवात झाली; मात्र मशीनमध्ये बिघाड झाल्याने सुमारे एक तास मतदान प्रक्रिया थांबली होती. तर जुळेवाडी येथे मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी उत्तरेत १४ हजार ६७८ पुरुष तर ४ हजार ५६८ स्त्रिया आणि दक्षिणेत १२ हजार ६८० पुरुष तर ५ हजार २३० स्त्री मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष लोकसभेचे उमेदवार पंजाबराव पाटील यांनी टाळगाव येथे मतदान केले.

यावेळी कऱ्हाड तालुक्यातील किरपे गावातील गणपत धोंडिबा कांबळे या १९२७ मध्ये जन्मलेल्या आजोबांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांनी प्रत्येकास मतदान करा, असे आवाहनही केले.

मतदान यंत्रणांची स्थिती

कऱ्हाड उत्तरमध्ये ३३८ मतदान यंत्रांसह १०० मतदान यंत्रे अतिरिक्त ठेवण्यात आली आहेत. तर कऱ्हाड दक्षिणमध्ये ३१० मतदान यंत्रांसह ६० मतदान यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत.

Web Title: Machine fault in Kalgaav polling station in Karhad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.