ईडीची पिडा टाळण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा औरंगजेबास मुजरा - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 05:25 PM2019-04-23T17:25:57+5:302019-04-23T17:26:33+5:30

ईडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मुजरा केला. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले अशी टीकाही मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

Lok Sabha Elections 2019: Dhananjay Munde criticism on Uddhav Thackeray | ईडीची पिडा टाळण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा औरंगजेबास मुजरा - धनंजय मुंडे

ईडीची पिडा टाळण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा औरंगजेबास मुजरा - धनंजय मुंडे

Next

उरण -  तुम्ही ग्रामपंचायतीचे-जिल्हापरिषदचे सदस्य नाहीत, आमदार-खासदार-मंत्री काहीच नाही मग तुमच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? असा सवाल राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला. ईडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मुजरा केला. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले अशी टीकाही मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी मावळमध्ये जोरदार समाचार घेतला. हाफ चड्डीची फुल पॅन्ट झाली म्हणजे माणसाला अक्कल येते असे नाही. २३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या चड्डीत रहायचे. नाहीतर निवडणूकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नाही असा टोला धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उरण येथील कोप्रोली नाका सभेस संबोधित केले. या सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी  मुख्यमंत्र्यांवर आणि उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. 

पवार कुटुंबियांनी जबाबदारी घेतली की त्या भागाचा विकास करणं हे त्यांचे ब्रीदवाक्य असते. शरद पवारांचे नातू व अजित पवारांचे चिरंजीव असलेल्या पार्थमध्येसुद्धा लोकांसाठी झोकून देऊन काम करण्याची धमक आहे. त्यामुळेच उरण भागातून सर्वाधिक लीडने पार्थ पवारांना निवडून द्या असे आवाहन धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले. अधर्माच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनास साद घातली होती. मावळची लढाई जिंकण्यासाठी मोठ्या विश्वासाने पार्थ पवारांना उमेदवारी दिली आहे. पार्थच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पातळीवरील बंदरालगत असलेल्या शहरांसारखाच उरण शहराचा विकास होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपाकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार लोकसभा लढवत आहेत त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाला घेऊन पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 
 

Web Title: Lok Sabha Elections 2019: Dhananjay Munde criticism on Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.