सुनील तटकरे राज्यसभेवर गेल्यास तिढा सुटेल? रायगडची जागा सोडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 12:33 PM2024-01-31T12:33:28+5:302024-01-31T12:34:02+5:30

Raigad Lok Sabha Constituency: राज्यसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून, राज्यातील ६ खासदारांचीही मुदत २ फेब्रुवारीला संपत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे.

If Sunil Tatkare goes to the Rajya Sabha, will the rift be resolved? Possibility of vacating the Raigad seat | सुनील तटकरे राज्यसभेवर गेल्यास तिढा सुटेल? रायगडची जागा सोडण्याची शक्यता

सुनील तटकरे राज्यसभेवर गेल्यास तिढा सुटेल? रायगडची जागा सोडण्याची शक्यता

अलिबाग - राज्यसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून, राज्यातील ६ खासदारांचीही मुदत २ फेब्रुवारीला संपत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे. सुनील तटकरे हे राज्यसभेवर गेल्यास रायगड लोकसभेची जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. यामुळे जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

शिवसेना-शिंदे गट, भाजप, अजित पवार गट सत्तेत आहे. सुनील तटकरे यांना राज्यसभेवर पाठविण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरूच
- गेले काही दिवस रायगड लोकसभा जागेवरून सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपने रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे, तर रायगड लोकसभा लढविणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. 
- दुसरीकडे शिंदे गटानेही या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपने पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचे नाव लोकसभेसाठी पुढे आणले आहे. 
- अलिबाग येथे नुकत्याच झालेल्या समन्वय मेळाव्यात याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आमनेसामने आल्याचे चित्र आहे. तटकरे यांना राज्यसभेवर पाठविल्यास रायगडच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस इतरत्र जागा मागण्याची शक्यता आहे.

Web Title: If Sunil Tatkare goes to the Rajya Sabha, will the rift be resolved? Possibility of vacating the Raigad seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.