निरोप देतो देवा आता आज्ञा असावी! पुण्यातील मानाच्या गणपतींचा नयनरम्य विसर्जन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 11:33 PM2020-09-01T23:33:26+5:302020-09-01T23:58:45+5:30

दरवर्षी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन सोहळ्याला प्रचंड गर्दी होत असते.परंतु, कोरोनामुळे यावर्षी साधेपणाने पण पूर्ण परंपरांचा मान राखत रंगलेला हा नयनरम्य विसर्जन सोहळा.. ..

पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीला महापौर हार घालतात व त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते..(सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे)

कसबा गणपतीचा नयनरम्य आरती सोहळा

मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीचे विसर्जन - ११ वाजून ४५ मिनिटांनी

मानाचा दुसरा गणपती असा नावलौकिक असलेल्या तांबडी जोगेश्वरीच्या श्रींची मनमोहक मूर्ती

तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन सोहळा - १२ वाजून ४५ मिनिटांनी विसर्जन

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम- फुलांच्या माळांची आकर्षक सजावट असलेल्या कुंडात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गुरुजी तालीम मंडळाच्या 'श्रीं' चे - १ वाजता विसर्जन

मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग गणपती

चौथ्या मानाच्या गणपती विसर्जनाअगोदर नयनरम्य पालखी सोहळा रंगला.त्यानंतर मूर्तीचे विसर्जन - १ वाजून १० मिनिटे

केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी भाजप आमदार मुक्ता टिळक, दीपक टिळक रोहित टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपक टिळकांच्या हस्ते श्रींची आरती

मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात केसरीवाडा गणपतीचे विसर्जन-१ वाजून ३० मिनिटे

भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव हा अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ओळख मंडळाकडून सांगितली जाते

भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जन सोहळा..१ वाजून ३० मिनिटांनी विसर्जन