"आपके भी छह भाई हैं"! पंतप्रधान मोदी यांच्या 'त्या' वक्तव्यावरून असदुद्दीन ओवैसी यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 08:02 PM2024-04-22T20:02:43+5:302024-04-22T20:03:05+5:30

आपल्याला सहा भाऊ आहेत. अमित शहा यांनाही सहा बहिणी आहेत. रविशंकर प्रसाद यांनाही सात भाऊ आणि बहिणी आहेत? असे म्हणत हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधन मोदींवर निशाणा साधला.

lok sabha elections 2024 Asaduddin Owaisi targeted for PM Modi's 'that' statement says narendra modi six brothers | "आपके भी छह भाई हैं"! पंतप्रधान मोदी यांच्या 'त्या' वक्तव्यावरून असदुद्दीन ओवैसी यांचा निशाणा

"आपके भी छह भाई हैं"! पंतप्रधान मोदी यांच्या 'त्या' वक्तव्यावरून असदुद्दीन ओवैसी यांचा निशाणा

काल पंतप्रधानांचे भाषण झाले. ते (पीएम) म्हणाले, मुस्लीम अनेक मुलं जन्माला घालतात आणि ते घुसखोर आहेत. पीएम मोदी, आपण लांब लांब फेकता. आमचा प्रजनन दर कमी झाला आहे. आपल्याला सहा भाऊ आहेत. अमित शहा यांनाही सहा बहिणी आहेत. रविशंकर प्रसाद यांनाही सात भाऊ आणि बहिणी आहेत? असे म्हणत हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधन मोदींवर निशाणा साधला. ते सोमवारी बिहारमधील डगरुआ येथे बोलत होते. 

ओवेसी पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी, आपण आम्हाला घुसखोर कसे म्हणालात? आपण देश तोडण्याचे आणि कमकुवत करण्याचे काम करत आहात. नरेंद्र मोदी, किती खोटं बोलणार? अरब आणि दुबईत जाऊन आपण 'या हबीबी' (प्रेय अशा अर्थाने) म्हणतात. मात्र, येथील मुस्लिमांना कमकुवत म्हणून बघण्याची आपली इच्छा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावर भडकले ओवैसी? -
राजस्थानातील बांसवाडा येथे काँग्रेसवर हल्ला चढवताना मोदी म्हणाले होते, काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या संपत्तीचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने देशाच्या मालमत्तेवर पहिला अधिकार मुस्लिमांचा असल्याचे म्हटले होते. म्हणजेच हे संपत्ती एकत्रित करून कुणाला वाटणार? हे अशांना वाटणार, ज्यांना अधिक मुलं आहेत. घुसखोरांना वाटणार. आपण मेहनतीने कमावलेला पैसा घुसखोरांना दिला जावा का? आपल्याला हे चालेल का? 

Web Title: lok sabha elections 2024 Asaduddin Owaisi targeted for PM Modi's 'that' statement says narendra modi six brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.