भाजपाकडून उमेदवारांची दहावी यादी प्रसिद्ध, या नेत्यांना संधी, महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 02:05 PM2024-04-10T14:05:07+5:302024-04-10T14:05:51+5:30

Lok Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दहावी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये भाजपाने चंडीगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील एकूण ९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्रातील काही जागांवरील उमेदवारांची घोषणा भाजपाने आजही केलेली नाही. 

Lok Sabha Election 2024: Tenth list of candidates released by BJP, opportunity for these leaders, candidates from Maharashtra are not included | भाजपाकडून उमेदवारांची दहावी यादी प्रसिद्ध, या नेत्यांना संधी, महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नाही 

भाजपाकडून उमेदवारांची दहावी यादी प्रसिद्ध, या नेत्यांना संधी, महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नाही 

भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दहावी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये भाजपाने चंडीगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील एकूण ९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्रातील काही जागांवरील उमेदवारांची घोषणा भाजपाने आजही केलेली नाही. 

भाजपाने आज प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये चंडीगडमध्ये विद्यमान खासदार किरण खेर यांच्याऐवजी संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये मैनपुरी येथून जयराज सिंह ठाकूर, कौशाम्बी येथून विनोद सोनकर, फूलपूर येथून प्रवीण पटेल,  अलाहाबाद (प्रयागराज) येथून नीरज त्रिपाठी, बलिया येथून नीरज शेखर, मछलीशहर येथून बी.पी. सरोज आणि गाझीपूर येथून पारसनाथ राय यांना ऊमेदवारी दिली आहे. 

तर या यादीमधून भाजपाने पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील आपल्या उमेदवाराचीही घोषणा केली आहे. भाजपाने आसनसोल येथून एस. एस. अहलुवालिया यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना तृणमूल काँग्रेसच्या शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी होणार आहे. 

Web Title: Lok Sabha Election 2024: Tenth list of candidates released by BJP, opportunity for these leaders, candidates from Maharashtra are not included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.