भाजपाची तिसरी यादी आज जाहीर होणार? ब्रिजभूषण यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:39 AM2024-03-19T11:39:33+5:302024-03-19T11:42:24+5:30

Lok Sabha Election 2024 : भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील उर्वरित 25 जागांसाठी उमेदवार निवडीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

bjp will release third candidate list today for lok sabha election 2024, may cut varun gandhi ticket brijbhushan sharan singh wife manoj sinha | भाजपाची तिसरी यादी आज जाहीर होणार? ब्रिजभूषण यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता

भाजपाची तिसरी यादी आज जाहीर होणार? ब्रिजभूषण यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता

Lok Sabha Election 2024 : नवी दिल्ली :  भाजपाकडून (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. याआधी पक्षाकडून 267 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील उर्वरित 25 जागांसाठी उमेदवार निवडीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाराबंकी मतदारसंघात उपेंद्र रावत यांच्या जागी भाजपा नव्या चेहऱ्याला संधी देऊ शकतो. याशिवाय, चर्चेत असलेल्या कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून ब्रिजभूषण सिंह यांची पत्नी केतकी देवी सिंह किंवा मुलगा करण भूषण सिंह यांना भाजपा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, एनडीएचा मित्रपक्ष अपना दल (एस) ला फक्त मिर्झापूर आणि रॉबर्टसगंज या जुन्या जागा दिल्या जाऊ शकतात.

अरुण गोविल यांना मेरठमधून तिकीट मिळू शकते
मेरठच्या जागेवर अभिनेता अरुण गोविल आणि कॅन्टचे आमदार अमित अग्रवाल यांच्यापैकी एकाला तिकीट दिले जाऊ शकते. त्याचबरोबर गाझियाबादच्या जागेसाठी विद्यमान खासदार जनरल व्हीके सिंह यांच्यासोबतच अनिल अग्रवाल किंवा अनिल जैन यांच्या नावाला मंजुरी मिळू शकते.

सिन्हा यांचा मुलगा अनुभव सिन्हा यांच्या नावाची चर्चा
प्रयागराज जागेबाबतही बैठकीत चर्चा झाली. या जागेवर संजय मिश्रा आणि योगी सरकारमधील मंत्री नंद गोपाल नंदी यांच्या यांच्या पत्नी अभिलाषा नंदी यांच्या नावाची चर्चा आहे. गाझीपूरमधून मनोज सिन्हा यांचा मुलगा अनुभव सिन्हा याच्या नावाचा विचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मनोज पांडे बरेलीतून निवडणूक लढवू शकतात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायबरेलीमधून भाजपा समाजवादी पक्षातून आलेल्या मनोज पांडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. देवरिया मतदारसंघातून विद्यमान खासदार रमापती राम त्रिपाठी यांना दुसरी संधी देण्याची चर्चा आहे. बलियामधून नीरज शेखर किंवा आनंद स्वरूप शुक्ला यांच्या नावाचा विचार करण्यात आला आहे. कानपूरमधून विद्यमान खासदार सत्यदेव पचौरी यांची कन्या नीतू सिंग आणि सतीश महाना आणि मैनपुरीमधून राज्याचे पर्यटन मंत्री जयवीर सिंग, तर माजी मंत्री सुरेश राणा आणि राघव लखनपाल सहारनपूरमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. 

राजस्थानमध्ये नव्या चेहऱ्यांना तिकीट मिळू शकते
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सोनीपतमधून भाजपा लोकसभा निवडणुकीसाठी योगेश्वर दत्त यांना संधी देऊ शकते. याशिवाय जयपूर ग्रामीणमधून लालचंद कटारिया, दौसा येथून जगमोहन मीना, अजमेरमधून सतीश पुनिया, जयपूरमधून राजाराम गुर्जर यांना तिकीट दिले जाऊ शकते. याचबरोबर, भाजपा खासदार जसकौर मीना, सुखबीर जौनपुरिया आणि रामचरण बोहरा यांची तिकिटे रद्द करून नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकते, अशीही चर्चा आहे.

Web Title: bjp will release third candidate list today for lok sabha election 2024, may cut varun gandhi ticket brijbhushan sharan singh wife manoj sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.