नाशिकरोड, देवळाली गावात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:01 AM2019-05-24T00:01:36+5:302019-05-24T00:24:09+5:30

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बहुमताकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र स्पष्ट होताच दुपारी बिटको चौकात ढोल-ताशांच्या गजरात घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 Nashikarod, Deolali village dazzle | नाशिकरोड, देवळाली गावात जल्लोष

नाशिकरोड, देवळाली गावात जल्लोष

Next

नाशिकरोड : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बहुमताकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र स्पष्ट होताच दुपारी बिटको चौकात ढोल-ताशांच्या गजरात घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर देवळालीगावात शिवसेनेकडून मतदारांच्या आभाराचे पोस्टर लावून आनंदोत्सव साजरा केला.
बिटको चौकात ढोल-ताशांच्या गजरावर ताल धरत घोषणा देत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला. भाजपा व मोदींचा जयजयकार करत पेढे वाटले. यावेळी नगरसेवक प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक बाजीराव भागवत, संभाजी मोरूस्कर, शरद मोरे, संगीता गायकवाड, सुनील आडके, शांताराम घंटे, राजेंद्र ताजणे, रामदास सदाफुले, टिंकू खोले, जयंत नारद, संजय घुले, संजय कोचरमुथा, योगेश भोर, राजेश आढाव, राम वाघ, नामदेव आढाव, नवनाथ ढगे, गणेश सातभाई, प्रकाश घुगे आदी उपस्थित होते. मोटवानीरोड येथील नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

Web Title:  Nashikarod, Deolali village dazzle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.