काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी पद सोडले, उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज

By प्रसाद गो.जोशी | Published: April 11, 2024 03:14 PM2024-04-11T15:14:48+5:302024-04-11T15:15:51+5:30

Lok Sabha Elections 2024: एक पत्रकार परिषद घेत डॉ. शेवाळे यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.

Congress District President Dr. Tushar Shewale resigned | काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी पद सोडले, उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज

काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी पद सोडले, उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज

मालेगाव (जि. नाशिक) :  धुळे मतदार संघातून काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केल्याने संतप्त झालेले काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिली आहे. एक पत्रकार परिषद घेत डॉ. शेवाळे यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.

काँग्रेसने धुळे लोकसभा मतदार संघातून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथून आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी डॉ. शेवाळे यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यांना डावललल्याने त्यांनी पद सोडत आपला राग व्यक्त केला आहे. पक्षाने अद्यापही बच्छाव यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान डॉ.बच्छाव या मालेगावच्या भेटीवर आल्या असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर डॉ. बच्छाव या पुढे रवाना झाल्या.

Web Title: Congress District President Dr. Tushar Shewale resigned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.