‘लाव रे व्हिडीओ’ला आता ‘क्लिप’ने प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:37 AM2019-04-25T01:37:15+5:302019-04-25T01:38:57+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विसंगत भूमिका व्हिडीओतून जाहीर सभेत लावणाऱ्या राज ठाकरे यांच्या ‘लाव रे व्हिडीओ’ची त्यांचेच बंधू आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘ती क्लिप लावता येत असेल तर बघा’, असे म्हणत कॉपी केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विधानाविषयी राहुल गांधी काय बोलले होते ते विधान दाखवले,

 'Claw' now responds to 'Lav Ray Video' | ‘लाव रे व्हिडीओ’ला आता ‘क्लिप’ने प्रत्युत्तर

‘लाव रे व्हिडीओ’ला आता ‘क्लिप’ने प्रत्युत्तर

Next

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींची विसंगत भूमिका व्हिडीओतून जाहीर सभेत लावणाऱ्या राज ठाकरे यांच्या ‘लाव रे व्हिडीओ’ची त्यांचेच बंधू आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘ती क्लिप लावता येत असेल तर बघा’, असे म्हणत कॉपी केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विधानाविषयी राहुल गांधी काय बोलले होते ते विधान दाखवले, तर दुसरीकडे गिरणारे येथे झालेल्या सभेत राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील युतीच्या नेत्यांचे व्हिडीओ दाखवून वाभाडे काढले.
राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात सभांचा धडा लावला असून, कठोर टीका करतानाच ते मोदी यांचे व्हिडीओ दाखवत आहेत. राज यांनी सभेच्या वेळी व्यासपीठावर लाव रे तो व्हिडीओ म्हटले की भाजप समर्थकांत अस्वस्थता निर्माण होते. परंतु हेच तंत्र आता अन्य पक्षांत वापरले जात असून, बुधवारी (दि. २५) हुतात्मा कान्हेरे मैदानात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याचाच वापर केला. मी ‘लाव रे तो व्हिडीओ’ असे म्हणणार
नाही, असे सांगून त्यांनी एक व्हिडीओ क्लिप लावण्यास सांगितले.  यात कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागण्यास कसे लाचार होऊ शकत होते, हेच विरोधकांचे डीएनए असल्याचे म्हणताना दिसत आहेत. यावर ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीरांविषयी अवमानकारक उद्गार काढणाºया राहुल गांधी यांच्यावर टीका केली. सावरकरांनी १४ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्यावेळी राहुल गांधी यांचा जन्मही झाला नव्हता, असा टोला लगावला.
गिरणारे येथील आघाडीच्या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘लाव रे व्हिडीओ’ची स्टाईल वापरली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दत्तक घेण्याच्या घोषणेचा व्हिडीओ लावून नाशिकसाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिले, असा सवाल उपस्थित केला. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा क डेवर बसलेली मुलगी चौकीदार चोर है बोलतानाचा व पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचा व्हिडीओ, त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकला चलो चा नारा देणारी घोषणा आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणांची खिल्ली उडविणारा मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ सभेत दाखविला. उद्धव ठाकरेंनी युती केल्यामुळे शिवसैनिकांना शरमेने मान खाली घालावी लागल्याचेही ते म्हणाले.

 

Web Title:  'Claw' now responds to 'Lav Ray Video'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.