अभिनेता आदिनाथ कोठारे व अभिनेत्री उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. काही महिन्यांपूर्वी उर्मिलाने जिजासोबतचा जिममधील वर्कआऊट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्या व्हिडिओची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्या दोघींचा आणखीन एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यात उर्मिला जिजासोबत वर्कआऊट करताना दिसत आहे. 

उर्मिलाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत उर्मिला अॅब्स मारताना दिसते आहे आणि यावेळी ती जिजाला सांभाळत तिच्याशी मस्ती करत वर्कआऊट करते आहे. हा व्हिडिओ शेअर करीत उर्मिलाने म्हटले की, बाळाला हसवत अॅब्स मारतेय हे जाणावले देखील नाही.


उर्मिलाचा जिजासोबतचा व्हिडिओ पाहून खरेच उर्मिलाचे कौतूक वाटत आहे आणि हा व्हिडिओ पाहून आई असणाऱ्या महिलांना वर्कआऊटसाठी प्रेरणा मिळेल.

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. तसेच अनेक समारंभ, पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र पाहिले जाते.

आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांना त्यांची जोडी खूपच आवडते. 
 


Web Title: Urmila Kothare and Jija's workout funniest video
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.