सावनी रविंद्रच्या चाहत्यांचे छोटेखानी ‘गेट-टू-गेदर’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:32 PM2018-10-09T16:32:42+5:302018-10-09T16:37:03+5:30

नुकतेच सावनी रविंद्र आपल्या चाहत्यांना भेटली. तिचे चाहते तिला भेटून खूप खूश झाले.

Savani Ravindra fans get together | सावनी रविंद्रच्या चाहत्यांचे छोटेखानी ‘गेट-टू-गेदर’

सावनी रविंद्रच्या चाहत्यांचे छोटेखानी ‘गेट-टू-गेदर’

googlenewsNext
ठळक मुद्देचाहत्यांना भेटल्यानंतर जबाबदारी वाढली - सावनीसावनी रविंद्र भेटली चाहत्यांना

कोणत्याही सेलिब्रेटीजच्या आयुष्यात चाहत्यांचे खूप महत्व असते. फॅनफॉलोविंग स्टार्सना प्रसिद्धीच्या शिखरावर जायला आणि टिकून राहायला मदत करते. आपल्या सुरेल आवाजाने गायिका सावनी रविंद्रने रसिकांना भुरळ पाडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. नुकतेच सावनी आपल्या चाहत्यांना भेटली. तिचे चाहते तिला भेटून खूप खूश झाले.

आपल्या सुरेख आवाजाने गायिका सावनी रविंद्र हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत एक से एक गाणी गायिली आहेत. तिच्या प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. सावनी ही खूप चांगली गायिका म्हणून आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि पाश्चिमात्य संगीताची उत्तम समज असे कमालीचा कॉम्बो सावनीच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळतो. सावनीने तामिळ इंडस्ट्रीमध्ये देखील खूप गाणी गायली आहेत. नुकतेच तिचे वेन्निलविन सालईगलिल हे गाणे प्रदर्शित झाले आहे. तिच्या या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात लाइक्स मिळताना दिसत आहे. छोटया पडदयावरदेखील तिच्या आवाजाची जादू ऐकण्यास मिळाली. सावनीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
आपल्या चाहत्यांची एक छोटेखानी गेट-टू-गेदरमध्ये नुकतीच सावनीने भेट घेतली. एका कॉन्टेस्टव्दारे काही लकी चाहत्यांना सावनीला भेटायची संधी मिळाली. सावनी या मिट-एण्ड-ग्रिट संदर्भात सांगितले की, “या समारंभासाठी पूणे, मुंबईच नाही तर लातूर, सोलापूरहून अनेक चाहते आले होते. माझ्यावर त्यांनी केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आता अजून जबाबदारीची जाणीव झाली आहे. चाहत्यांना भेटल्यानंतर काम करण्यासाठी खूप हुरूप मिळतो. तसेच अधिकाधिक उतमोत्तम काम करण्याकडे आपण लक्ष द्यायला हवे, याची जाणीव होते. तसेच ह्या मिट-एन्ड-ग्रीटला मिळालेल्या प्रतिसादावरून वर्षातून एकदातरी अशी मिट-एन्ड-ग्रीट चाहत्यांसाठी ठेवायचा निर्णय घेतलाय.”
 

 

 

Web Title: Savani Ravindra fans get together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.