'परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 02:29 PM2018-08-20T14:29:41+5:302018-08-20T14:33:26+5:30

अभिनेते नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार, फ्लोरा सैनी, बालकलाकार श्रुती निगडे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असलेला ‘परी हूँ मैं’ ग्लॅमरस चंदेरी दुनियेतील वास्तवाच्या जवळ जाणारा मनोरंजक, कौटुंबिक आणि भावना प्रधान चित्रपट आहे.

Pari Hoon Main marathi movie trailer launched | 'परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

'परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

googlenewsNext

योगायतन फिल्म्स प्रस्तुत ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अष्टपैलू व्यक्तिमत्व, राष्ट्रीय खेळाडू, कँब्रिज विद्यापीठातील टॉपर (२०१८), यंग भारतीय फाउंडेशनचे संस्थापक  अमेय प्रताप सिंह यांच्या हस्ते ट्रेलर आणि म्युझिक लाँच करण्यात आले. योगायतन ग्रुपचे चेअरमन डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि  शीला सिंह चित्रपटाचे निर्माते असून दिग्दर्शक रोहित शिलवंत आहेत.

अभिनेते नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार, फ्लोरा सैनी, बालकलाकार श्रुती निगडे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असलेला ‘परी हूँ मैं’ ग्लॅमरस चंदेरी दुनियेतील वास्तवाच्या जवळ जाणारा मनोरंजक, कौटुंबिक आणि भावना प्रधान चित्रपट आहे. या चित्रपटाला ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – २०१८’ मध्ये उत्कृष्ट मराठी चित्रपट आणि उत्कृष्ट मराठी अभिनेत्री पुरस्कार मिळाला आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘परी हूँ मैं’ चित्रपट नावाजला गेला आहे.

‘परी हूँ मैं’ या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये साजरी दिघे ऑडिशन देताना दिसते, तिच्या बोलक्या आणि निरागस अभिनयातून तिला एका मालिकेत परी नामक ऐश्वर्यसंपन कुटुंबातील लाडक्या मुलीची भूमिका साकारायची संधी मिळते. साजरीचे वडील माधव दिघे हे तिच्याबाबत संवेदनशील आणि अतिशय महत्वाकांक्षी असून शूटिंगच्या वेळी ते तिच्यासमवेत सावलीप्रमाणे राहतात तर दुसरीकडे अभिनयाच्या आणि झगमगाटाच्या दुनियेत आपल्या मुलीचे बालपण कुठे हरवू नये, याची तिच्या आईला काळजी आहे. प्रसिद्धी मिळाल्यानंतर साजरी आणि तिच्या कुटुंबात होणाऱ्या बदलांचा वेध ‘परी हूँ मैं’ या चित्रपटात घेतल्याचे ट्रेलरमध्ये दिसते. चंदेरी दुनियेकडे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या ध्येयपूर्तीची वाटचाल सांगणाऱ्या या चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची तर पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत.

‘परी हूँ मैं’ या चित्रपटातील गाणी संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केली असून अभिषेक खणकर आणि सचिन पाठक गीतकार आहेत. चित्रपटात तीन गीते असून प्रत्येक गीत वेगळ्या जॉनरचे आहे, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, अमृता फडणवीस, जिया वाडकर आणि मंदार पिलवलकर यांचा स्वर गीतांना लाभला आहे. शंकर महादेवन यांनी ‘वेगे वेगे धावू’ हे गीत गायले असून अमृता फडणवीस यांनी ‘चंदण बिलोरी’ ही अंगाई तर मंदार पिलवलकर यांनी ‘चंदण बिलोरी’चे मेल व्हर्जन गायले आहे. ‘परी हूँ मैं’ चे शीर्षकगीत जिया वाडकरने गायले असून तिचे हे पहिले पार्श्वगायन आहे. 

बहुचर्चित मध्यमवर्गीय दिघे कुटुंबातील साजरी ‘परी’ येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Web Title: Pari Hoon Main marathi movie trailer launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.