मीरा जोशी व मिलिंद इंगळे पहिल्यांदाच आले ह्या गाण्यासाठी एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 17:56 IST2018-08-17T17:52:14+5:302018-08-17T17:56:35+5:30

'तिला सांगा कुणी' हे गाणे 20 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Meera Joshi and Milind Ingle came together for this song | मीरा जोशी व मिलिंद इंगळे पहिल्यांदाच आले ह्या गाण्यासाठी एकत्र

मीरा जोशी व मिलिंद इंगळे पहिल्यांदाच आले ह्या गाण्यासाठी एकत्र

ठळक मुद्देमीराचे पावसातील हे पहिलेच गाणे 'तिला सांगा कुणी' गाण्याला स्वरसाज दिला मिलिंद इंगळेंनी

छोट्या पडद्यावरील मालिका 'तुझं माझं ब्रेकअप'मधून मेनका नामक ग्रे शेड भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी व 'गारवा...' गाजलेल्या गाण्याचे गायक व संगीतकार मिलिंद इंगळे पहिल्यांदाच एका अल्बमच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. 'तिला सांगा कुणी' असे या गाण्याचे नाव असून हे गाणे सौमित्र यांच्या लेखणीतून साकार झाले आहे आणि या गाण्याला संगीत व स्वरसाज मिलिंद इंगळे यांनी दिला आहे. हे गाणे मीरा व मिलिंद इंगळे यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. हे गाणे 20 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


या गाण्याबाबत सांगताना अभिनेत्री मीरा जोशी म्हणाली की, 'पावसातील हे माझे पहिलेच  गाणे आहे. आतापर्यंत मी केलेल्या गाण्यापेक्षा हे खूप वेगळे गाणे आहे. लहानपणी गारवाची गाणी ऐकली होती. मला त्यातली सर्व गाणी खूप आवडतात. त्यावेळी सिनेइंडस्ट्रीशी काहीच संबंध नव्हता. माझ्याकडे गारवाची कॅसेटदेखील होती. स्वप्नातही कधी वाटले नव्हते की  एक दिवस मी मिलिंद इंगळेंसोबत काम करण्याचा योग येईल. 'तिला सांगा कुणी' या गाण्याच्या निमित्ताने हा योग जुळून आला.'


'तिला सांगा कुणी' या गाण्याचे चित्रीकरण इगतपुरी येथील एका रिसॉर्टमध्ये करण्यात आले आहे. दोन दिवसात या गाण्याचे शूटिंग पार पडले आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभव अप्रतिम असल्याचे मीरा म्हणाली व पुढे सांगितले की, 'आम्ही ज्या ठिकाणी या गाण्याचे शूटिंग केले ते लोकेशन खूपच छान होते. या गाण्याच्या शूटिंगसाठी आम्हाला पाऊस हवा होता. मात्र पहिल्या दिवशी पाऊस पडलाच नाही. दुसऱ्या दिवशी पाऊस आम्ही निघता निघता पाऊस पडला व आम्हाला हवे तसे चित्रीकरण करता आले. निसर्गाच्या सान्निध्यात चित्रीत करायला खूप मजा आली.'

Web Title: Meera Joshi and Milind Ingle came together for this song