"जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत...", भाजपा उमेदवाराचा संकल्प! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 05:06 PM2024-04-21T17:06:51+5:302024-04-21T17:11:23+5:30

Ram Satpute : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राम सातपुते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

"Until the issue of Maratha reservation is resolved, until...", BJP candidate Ram Satpute resolution, solapur lok sabha election 2024 | "जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत...", भाजपा उमेदवाराचा संकल्प! 

"जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत...", भाजपा उमेदवाराचा संकल्प! 

solapur, lok sabha election 2024 : सोलापूर : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यादरम्यान, 'जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही,' असा संकल्प सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राम सातपुते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

रविवारी भगवान महावीर जयंती निमित्त सोलापुरात जैन बांधवांकडून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम सातपुते उपस्थित होते. यावेळी राम सातपुते यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांसमोर मी संकल्प केला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, मार्गी लागत नाही. तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. निवडून आल्यानंतरही मी फेटा घालणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी फेटा घालणार आहे, असे राम सातपुते म्हणाले. 

याचबरोबर, हिंदू लिंगायत समाजातील नेहा हिरेमठ या युवतीची फैयाज शेख नामक जिहादी मानसिकतेच्या तरुणाने हत्या केली. या घटनेचा मी निषेध करतो, असे राम सातपुते म्हणाले. तसेच, राम सातपुते यांनी काँग्रेसवरही निशाणा साधाला. मोदींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे निघत आहेत. मशिदीतून फतवे काढून संविधानाला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत, असा आरोपही राम सातपुते यांनी केला. 

दरम्यान, सोलापुरात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून भाजपाचे आमदार राम सातपुते यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळत आहे. प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे. तर राम सातपुते हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरसचे विद्यमान आमदार आहेत. तसेच, सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.

Web Title: "Until the issue of Maratha reservation is resolved, until...", BJP candidate Ram Satpute resolution, solapur lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.