नवनीत राणांनी भाजपात जाताना शरद पवारांनाही सांगितलेले; रवी राणांचे जोरदार प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 07:16 PM2024-04-22T19:16:18+5:302024-04-22T19:16:49+5:30

खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना शरद पवारांनी अमरावतीमध्ये एक चूक झाली होती, त्यासाठी मी तुमची माफी मागतो, असे ...

Navneet Rana told Sharad Pawar while joining BJP; Strong reply from Ravi Rana Amravati lok sabha election maharashtra | नवनीत राणांनी भाजपात जाताना शरद पवारांनाही सांगितलेले; रवी राणांचे जोरदार प्रत्यूत्तर

नवनीत राणांनी भाजपात जाताना शरद पवारांनाही सांगितलेले; रवी राणांचे जोरदार प्रत्यूत्तर

खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना शरद पवारांनीअमरावतीमध्ये एक चूक झाली होती, त्यासाठी मी तुमची माफी मागतो, असे म्हटले होते. यावरून आमदार रवी राणा यांनी शरद पवारांच्या या टीकेवर प्रत्यूत्तर दिले आहे. 

2019 मध्ये  शरद पवार यांचा पाठिंबा नवनीत राणा यांना मिळाला होता. नवनीत राणा यांना शरद पवार यांच्या आशीर्वादानेच खासदार बनण्याची संधी मिळाली आहे. नवनीत राणा जेव्हा भाजपामध्ये गेल्या, तेव्हा त्यांनी शरद पवारांना सांगितले होते. पवारांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यामुळे शरद पवार हे आमच्यासाठी आदरणीय आहेत, असा गौप्यस्फोट रवी राणा यांनी केला. 

याचबरोबर ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या त्याच भाजपमध्ये जाण्याची शरद पवार यांची सुद्धा इच्छा होती. म्हणून अजित पवार यांना त्यांनी भाजपसोबत पाठवले. अचानक सुप्रिया सुळे यांच्या हट्टापाई त्यांना थांबावे लागले, अशी टीकाही राणा यांनी केली. 

शरद पवार यांच्या मनात भाजप आहे, फक्त ओठावर विरोध आहे. त्यांचा मनामधल्या भाजपमध्ये नवनीत राणा आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे शरद पवार बोलले असतील, असा टोलाही राणआ यांनी लगावला. 

Web Title: Navneet Rana told Sharad Pawar while joining BJP; Strong reply from Ravi Rana Amravati lok sabha election maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.