तिसऱ्या टप्प्यासाठी ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध; अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 07:57 AM2024-04-22T07:57:26+5:302024-04-22T07:59:42+5:30

सर्वांत जास्त ४६ अर्ज बारामती मतदारसंघात तर सर्वांत कमी ९ अर्ज रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात वैध ठरले आहेत.  

Loksabha Election 2024 - Applications of 317 candidates valid for third phase; Deadline to withdraw applications today | तिसऱ्या टप्प्यासाठी ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध; अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

तिसऱ्या टप्प्यासाठी ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध; अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या  तिसऱ्या टप्प्यातील ११  मतदारसंघांत ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची  माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून   देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी, २२ एप्रिल रोजी संपत असून त्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होईल.

सर्वाधिक वैध अर्ज बारामतीत 
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात येत्या ७ मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी १९ एप्रिल रोजी संपली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २० एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. सर्वांत जास्त ४६ अर्ज बारामती मतदारसंघात तर सर्वांत कमी ९ अर्ज रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात वैध ठरले आहेत.  

रायगड    २१ 
बारामती    ४६ 
उस्मानाबाद    ३५ 
लातूर    ३१ 
सोलापूर    ३२ 
माढा    ३८ 
सांगली    २५ 
सातारा    २१ 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग    ९ 
कोल्हापूर    २७ 
हातकणंगले    ३२

Web Title: Loksabha Election 2024 - Applications of 317 candidates valid for third phase; Deadline to withdraw applications today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.