महायुतीतील शिवसेना लोकसभेच्या किती जागा लढवणार? शिंदे गटाच्या आमदारानं थेट आकडाच सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 05:13 PM2024-03-30T17:13:20+5:302024-03-30T17:15:29+5:30

...यामुळे, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) किती जागा मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

How many Lok Sabha seats will the Shiv Sena contest in the Grand Alliance The Eknath Shinde group MLA Sanjay shirsat directly told the number | महायुतीतील शिवसेना लोकसभेच्या किती जागा लढवणार? शिंदे गटाच्या आमदारानं थेट आकडाच सांगितला!

महायुतीतील शिवसेना लोकसभेच्या किती जागा लढवणार? शिंदे गटाच्या आमदारानं थेट आकडाच सांगितला!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही. यासंदर्भात अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. यामुळे, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) किती जागा मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यातच आता लोकसभेच्या 16 जागा शिवसेना (शिंदे गट) लढणार असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

आम्हाला माहीत आहे आमचे काय बोलणे सुरू आहे -
यासंदर्भात बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, "आम्हाला माहीत आहे आमचे काय बोलणे सुरू आहे. किती जागा मिळतील हा आकडा शिंदे साहेबांना माहीत आहे. इतर लोक काय म्हणतात यावर तुम्हीही विश्वास ठेऊ नका आणि आमचा तर नसतोच. म्हणून कमीत कमी 16 च्या पुढे ही फिगर जाईल, अशी आमची अपेक्षा आहे. 16 ते 18 दरम्यान जागा मिळतील एवढं मात्र निश्चित आहे. त्या पद्धतीनेच शिंदे साहेबांची बोलणी सुरू आहे." शिरसाट टीव्ही 9 मराठी सोबत बोलत होते.

तसेच, "पक्षाची वाढ करत असताना किंवा पक्ष मजबुतीने उभा करत असताना, खासदारही त्या ताकदीचे निवडून यायला हवेत. हा आमचा मानस आहे आणि त्यासाठी असलेला हा प्रयत्न आहे, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.

Web Title: How many Lok Sabha seats will the Shiv Sena contest in the Grand Alliance The Eknath Shinde group MLA Sanjay shirsat directly told the number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.