मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल, लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची बैठक सुरू

By समीर देशपांडे | Published: April 13, 2024 04:04 PM2024-04-13T16:04:09+5:302024-04-13T16:05:35+5:30

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूर मध्ये दाखल झाले आहेत. येथील एका हॉटेलवर प्रमुख नेत्यांची ...

Chief Minister Eknath Shinde arrived in Kolhapur, an important meeting regarding the Lok Sabha elections started | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल, लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची बैठक सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल, लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची बैठक सुरू

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूर मध्ये दाखल झाले आहेत. येथील एका हॉटेलवर प्रमुख नेत्यांची त्यांनी बोलावलेली बैठक सुरू झाली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महायुतीचे आमदार, लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या निवडणुकीसाठीची व्युव्हरचना म्हणून या बैठकीकडे बघितले जाते. या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे मंडलिक आणि माने यांना पाठबळ देण्यासाठी आणि सर्व नेत्यांना सक्रिय करण्यासाठी शिंदे यांनी ही बैठक बोलावली आहे. याच बैठकीत सध्या दोन्ही मतदारसंघांचा आढावा घेऊन योग्य ती जबाबदारी प्रत्येकावर देण्याबाबत चर्चा सुरू असून यानंतर संध्याकाळी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा ही होणार आहे.

Web Title: Chief Minister Eknath Shinde arrived in Kolhapur, an important meeting regarding the Lok Sabha elections started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.