"पराभव जेव्हा समोर दिसतो, तेव्हा माणूस तडफडतो", श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

By मुरलीधर भवार | Published: April 25, 2024 03:49 PM2024-04-25T15:49:11+5:302024-04-25T15:49:36+5:30

कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण पूर्व परिसरात आज खासदार शिंदे हे प्रतिष्ठीत नागरीकांच्या भेटीगाठी घेत आहे.

"When defeat is in front of you, one breaks down", Shrikant Shinde's quip to Aditya Thackeray | "पराभव जेव्हा समोर दिसतो, तेव्हा माणूस तडफडतो", श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

"पराभव जेव्हा समोर दिसतो, तेव्हा माणूस तडफडतो", श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

कल्याण :  पराभव जेव्हा समोर दिसतो. तेव्हा माणूस तडफडतो असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्ववसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. 

कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण पूर्व परिसरात आज खासदार शिंदे हे प्रतिष्ठीत नागरीकांच्या भेटीगाठी घेत आहे. यावेळी त्यांनी उपरोक्ट टोला आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्य नंतर खासदार शिंदे यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. 

खासदार शिंदे म्हणाले की, आमच्यावर बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे आणि आमच्या आई-वडिलांच्या चांगले संस्कार आहेत. आपल्या लायकीप्रमाणे आपण बोलले पाहिजे. लायकी नसताना आपण ज्यांच्यावर बोलतो ते जनता बघत असते. २० मे ला जनताच त्याना उत्तर देईल. तूमचे योगदान काय? तुमची पात्रता काय? तुमची लायकी काय? असा सवाल उपस्थित केला आहे. आरशामध्ये पाहिले की आपली पात्रता आणि औकात काय हे त्यांना कळेल.

Web Title: "When defeat is in front of you, one breaks down", Shrikant Shinde's quip to Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.