selena gomez got 24 crores to post one photo on social media | वाचा सेलिना गोमेजला सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करण्यासाठी मिळतात तब्बल इतके करोड
वाचा सेलिना गोमेजला सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करण्यासाठी मिळतात तब्बल इतके करोड

सोशल नेटवर्किंग साईटवर आपले फोटो, व्हिडिओ सतत टाकण्याची अनेकांना आवड असते. आपण काय करत आहोत, कुठे जात आहोत हे लोकांना कळले पाहिजे असा अनेकांचा यामागचा हेतू असतो. काहींना याद्वारे आपली लोकप्रियता वाढवायची असते. पण तुम्हाला माहीत आहे का, काही जणांना सोशल मीडियावर त्यांचे फोटो पोस्ट करायला पैसे मिळतात. हो हे खरे आहे... अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर पोस्ट टाकून चांगलाच पैसा कमावतात. या पोस्टसाठी काही जण हजारोत तर काही जण लाखोत कमावतात. पण  तुम्हाला माहीत आहे का, एका सेलिब्रेटीला केवळ एक पोस्ट टाकण्यासाठी 24 कोटी मिळतात. ही सेलिब्रेटी कोणी बॉलिवूडमधील नसून ही हॉलिवूडची सेलिब्रेटी आहे.

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सेलिना गोमेजला एक पोस्ट टाकण्यासाठी 24 करोड रुपये मिळतात असे डब्ल्यू या मासिकाने नुकतेच त्यांच्या एका बातमीत म्हटले आहे. सेलिना केवळ 26 वर्षांची आहे. तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोव्हर्स आहेत. ती गायनासोबतच विजार्ड ऑफ वेवर्ली या मालिकेतील एलेक्स रुसोच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. तसेच ती अँड द सीन नावाच्या पॉप बँडची मुख्य गायिका आहे. सेलिना खूपच लहान वयात एका आजाराला सामोरी गेली होती. सप्टेंबर 2017 मध्ये सेलिनाची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. तिची मैत्रीण फ्रान्सिया रेसियाने तिला किडनी दिली होती. या आजारपणामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तिने गायन, अभिनय सगळे काही सोडून दिले होते. ती या सगळ्यातून बाहेर पडेल असे तिला वाटलेच नव्हते. तिने मुलाखतीत देखील सांगितले होते की, मी या आजारपणातून कधी बाहेर पडेन असे मला वाटले नव्हते. पण माझ्या लाडक्या मैत्रिणीने मला किडनी दिली आणि तिच्यामुळेच मी या आजारपणातून बाहेर पडले. 

सेलिना ही तिच्या अभिनय, गाण्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. पण त्याचसोबत ती आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आली होती. तिचे पॉप स्टार जस्टिन बीबरसोबत अफेअर होते. या अफेअरची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती. 


Web Title: selena gomez got 24 crores to post one photo on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.