jennifer lopez engaged with alex rodriguez | जेनिफर लोपेजने सहाव्यांदा केला सारखपुडा!
जेनिफर लोपेजने सहाव्यांदा केला सारखपुडा!

सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका व अभिनेत्री जेनिफर लोपेजने  बेसबॉलचा निवृत्त खेळाडू एलेक्स रोड्रिगेजसोबत साखरपुडा केला. जेनिफर व एलेक्स गत दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोन वर्षांच्या डेटनंतर दोघांनीही साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गत शनिवारी हा साखरपुडा पार पडला. कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल पण जेनिफरचा हा सहावा साखरपुडा आहे.


जेनिफरने आपल्या सोशल अकाऊंटवर याबाबतची घोषणा केली. इन्स्टावर शेअर केलेल्या एका फोटोत जेनिफरच्या बोटात अंगठी दिसतेय. एलेक्सनेही सारखपुड्याच्या बातमीला दुजोरा दिला. ‘तिने होकार दिला,’ असे लिहित त्याने साखरपुड्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली.
२००५ मध्ये जेनिफर व अ‍ॅलेक्स यांची पहिली भेट झाली होती. क्वींसच्या शिआ स्टेडिअमवर ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. यापूर्वी जेनिफरने चार लग्न आणि १ साखरपुडा केला होता.

जेनिफर लोपेज ही अमेरिकन गायिका, अभिनेत्री, निर्माता आहे. इन लिव्हिंग कलर टेलिव्हिजन कॉमेडी शोमधून डान्सर म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. १९९९ मध्ये तिने आपला पहिला स्टुडिओ अल्बम रिलीज केला.


Web Title: jennifer lopez engaged with alex rodriguez
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.